निलेशभाऊ ताजने मित्र परिवार तर्फे मोफत ईश्रम कार्ड शिबीराला उस्फुर्त प्रतिसाद
निलेशभाऊ ताजने मित्र परिवार तर्फे मोफत ईश्रम कार्ड शिबीराला उस्फुर्त प्रतिसाद.
ईश्रम कार्ड शिबीराला २०० नागरिकांनी केली नोंदनी
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, नांदा फाटा : कोरपना तालुक्यातील नांदा फाटा येथे निलेश भाऊ ताजने मित्र मंडळ तर्फे मोफत ईश्रम कार्ड शिबिर आयोजित करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय मुसळे माझी अध्यक्ष संजय गांधी निराधार योजना कोरपना , उद्घाटक पुरषोत्तम आस्वले उपसरपंच नांदा, प्रमुख पाहुणे मेघा पेंदोर सरपंच नांदा, रत्नाकर चटप ग्राम पंचायत सदस्य नांदा, लहुजी गोंडे, लिलाबाई चंद्रगिरी ग्रा.प. सदस्य बीबी, दुर्गाताई पेंदोर ग्रा.प. सदस्य बीबी, ईश्रम कार्ड काढलं तर केंद्र सरकारकडून २ लाख रुपयांचा वीमा मोफत मिळेल
व श्रमिक अपघातात मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास २ लाख रुपयांची विमा मिळु शकते असे पुरषोत्तम आस्वले यावेळी सांगितले व निलेश ताजने यांनी सांगितले की केंद्र सरकारकडून योजनेचा नागरिकांनी लाभ घ्यावा व असेच नेहमी यापूळे पन शासनाकडून येणार्या सर्व कार्यक्रम निलेशभाऊ ताजने मित्र मंडळ तर्फे घेण्यात येणार आहे असे निलेश ताजने यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे यशस्वी करण्याकरिता आकाश बोंनगीरवार, प्रतिक सदनपवार, कृष्णा किरमीरवार , इम्रान शेख, सौरभ दास, विक्की शेट्टी , राकेश खेवले, रवि वर्मा, स़ंजय नित, हरी बोरकुटे, अजर शेख, राजेश यादव, मंगल प्रसाद, सतेंंदर सिंग व निलेश ताजने मित्र मंडळ सदस्य उपस्थित होते कार्यक्रम सुत्रसंचालन रविकुमार बंडीवार व प्रास्ताविक सुजित ठाकुर यांनी कले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत