गोरगरिबांवर अन्याय होऊ देणार नाही : जनसेवक पवन मस्के
गोरगरिबांवर अन्याय होऊ देणार नाही : जनसेवक पवन मस्के
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, भंडारा : गोरगरीब नागरिकांवर कधी अन्याय होऊ देणार नाही असे प्रतिपादन जनसेवक पवन मस्के यांनी केले आहे. आबादी प्लॉटच्या मुद्द्यावरून त्यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितले. सविस्तर वृत्त असे की भंडारा तालुक्यातील सिल्ली, बेला, कोरंभी (देवी )कवडशी व अन्य गावातील अनेक नागरिक हे मोलमजुरी करून आपल्या कुटुंबांचे उदरनिर्वाह करत असतात.
मात्र शासन आबादी क्षेत्रावर बांधकाम करून आपल्या कुटुंबासह रहवास करणाऱ्या मजूरदार कडून प्रशासनाच्या वतीने अशा भूखंडावर नागरिकांकडून कलम 51 अंतर्गत कारवाई करून 75 टक्के रक्कम भूखंड भरण्याची प्रशासनाने नोटीस बजावली आहे. मात्र परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने ते लोक ही 75 टक्के रक्कम देखील भरू शकत नाही. त्यामुळे हा गोरगरीब नागरिकांवर अन्याय होत असल्याचे सांगत पवन मस्के यांनी ही रक्कम सूट करण्यात यावी. अन्यथा आम्ही मोठा जन आक्रोश आंदोलन करू असा इशारा यावेळी जनसेवक पवन मस्के यांनी दिला आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत