Breaking News

माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचे पती देवीसिंह शेखावत यांचं निधन

 माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचे पती देवीसिंह शेखावत यांचं निधन

महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, पुणे : माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती देवीसिंह शेखावत यांचं आज पुण्यात निधन झालं. ते 89 वर्षांचे होते. हृदयविकाराचा झटका आल्यानं त्यांना दोन दिवसांपूर्वी पुण्यातील केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र आज सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. आज सायंकाळी 6 वाजता त्यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

कोण आहेत देवीसिंह शेखावत ? 

देवीसिंह शेखावत यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात अमरावतीच्या महापौरपदापासून केली होती. त्यानंतर ते अमरावतीमधूनच 1985 साली आमदार म्हणून निवडून आले. त्यांचं शिक्षणक्षेत्रात मोठं योगदान आहे. मुंबई विद्यापीठाकडून त्यांना 1972 रोजी पीएचडीची पदवी प्रदान करण्यात आली होती. याशिवाय ते विद्या भारती शिक्षण संस्था फाउंडेशन संचलित महाविद्यालयाचे प्राचार्य देखील होते. सात जुलै 1985 ला त्यांचा विवाह प्रतिभा पाटील यांच्याशी झाला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत