भरधाव कारचा भीषण अपघात; माय-लेकराने जागीच सोडला जीव
भरधाव कारचा भीषण अपघात; माय-लेकराने जागीच सोडला जीव
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, पुणे : जिल्ह्यातील भिगवण परीसरात स्विफ्ट कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. कार पलटी होऊन हा अपघात झाला आहे. चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि कार पलटी झाली. हा अपघात इतका भीषण होता की या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक व्यक्ती जखमी झाला. संदीप राजाभाऊ माळी वय 35, बालाजी केरबा तिडके वय 48 आणि सरस्वती राजाभाऊ माळी वय 61 वर्ष असं या अपघातामध्ये मृत्यू झालेल्यांची नावं आहेत, हे तिघेही लातूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत.
पहाटेच्या सुमारास अपघात
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी पहाटे पावणेचारच्या दरम्यान पुणे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सोलापूर - पुणे या लेनवर इंदापूर तालुक्यातील डाळज नं. 1 गावाच्या हद्दीत हा अपघात झाला. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्यानं पुण्याच्या दिशेने येणारी ही कार वाहन क्रमांक एम.एच.43 बी.एन.1402 भिगवण बस स्थानकापासून जवळच उतारावर पलटी झाली.
या अपघातामध्ये तिंघांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर एक जण जखमी झाला आहे, जखमी व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. चंद्रकांत रामकिशन गवळी वय 54 वर्ष रा. ज्योती नगर लातूर असं जखमी व्यक्तीचं नाव आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत