ओबीसी बहुजन महासंघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने श्रीमंत योगी शिवश्री छत्रपती शिवरायांची ३९३वी जयंती उत्साहात साजरी.
ओबीसी बहुजन महासंघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने श्रीमंत योगी शिवश्री छत्रपती शिवरायांची ३९३वी जयंती उत्साहात साजरी.
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, उदगीर : ओबीसी बहुजन महासंघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने रयतेचे राजे श्रीमंत योगी श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज यांची 393 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली . या जयंतीप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. या सोहळ्याप्रसंगी विमलताई मदने यांची ओबीसी बहुजन महासंघ महाराष्ट्र राज्याच्या महिला महासचिव पदी . स्मिताताई पोतदार यांना समाज भूषण पुरस्कार व पत्रकार सुभाष तगाळे यांची राष्ट्रीय प्रसिद्धीप्रमुख पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
या जयंती सोहळ्याप्रसंगी गंगाधर काळे रामजी मदने सचिन सदाफुले कु.रोहिणी साधू मंगलाताई गायकवाड योगिताताई नेत्र गावकर १२ बलुतेदार संघटनेचे लातूर जिल्हा अध्यक्ष सुधाकराव दापकेकर यांच्यासह आदींचा सन्मान करण्यात आला. या जयंती सोहळ्याप्रसंगी मंगलाताई गायकवाड योगिताताई नेत्रगावकर यांच्यासह आदींची उपस्थिती होती. या जयंती सोहळ्याचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ओबीसी बहुजन महासंघ महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष तथा टीचर ग्रुप ऑफ महाराष्ट्र राज्याचे संस्थापक बालाजी सुवर्णकार गुरुजी यांनी केले. हा जयंती सोहळा साजरा केल्याबद्दल ओबीसी बहुजन महासंघ चे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. राजकुमार घुले व दर्शनाताई घुले यांनी या शिवजयंतीच्या कार्यक्रमाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या आहेत.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत