Breaking News

बोदवड पोलिस ठाण्यातील लाचखोर हवालदारासह पंटर जळगाव एसीबीच्या जाळ्यात

 बोदवड पोलिस ठाण्यातील लाचखोर हवालदारासह पंटर जळगाव एसीबीच्या जाळ्यात

महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, सतीश बावसकर, जळगाव : खंडणीच्या गुण्यात मदत करणाऱ्या सह चाप्टर केस एलसीबी ऐवजी स्थानिक स्तरावर करण्यासाठी २० हजारांची लाच मागून तडजोडीअंती १६ हजाराची लाच स्वीकारणाऱ्या पंटरासह बोदवड मधील हवालदारास जळगाव एलसीबीच्या पथकाने अटक केल्याने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे शनिवारी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास बोदवड तहसील कार्यालयाच्या आवारात हा सापळा यशस्वी करण्यात आला हवालदार वसंत नामदेव निकम व खाजगी पंटर एकनाथ कृष्णा बाविस्कर अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

 असे आहे लाच प्रकरण बोदवड मधील तक्रार दाडसह त्याच्या तीन मित्र विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल असुन त्यात सी फायणल न्यायालयात पाठविण्यासाठी तपासाधिकारी असलेल्या हवालदार वसंत निकम यांनी प्रत्येकी ५ हजारा प्रमाणे २० हजारांची लाच मागितली होती मात्र चार हजार प्रत्येकी देण्याचे ठरल्यानंतर एसीबीकडे तक्रार करण्यात आली शनिवारी सकाळी ११.३० वाजता तहसील कार्यालयाच्या आवारात निकम यांनी पंटर एकनाथ बाविस्कर यांच्याकडे लाच रक्कम देण्याचे सांगितल्यानंतर पंटराने लाच स्वीकारतास हवालदाराला अटक करण्यात आली जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक शशीकांत पाटील यांच्या नेतृत्वात निरीक्षक संजोग बच्छाव व सहकाऱ्यांनी हा सापळा यशस्वी केला आहे.

सापळा व तपास अधिकारी - श्री.संजोग बच्छाव,पोलिस निरीक्षक, ला.प्र.वि.जळगांव.                     

सहसापळा अधिकारी व पथक - PI.एन.एन.जाधव, स.फौ.दिनेशसिंग पाटील, पो.ना.बाळू मराठे, पो.कॉ.राकेश दुसाने. पो. हे. काॅ. अशोक अहिरे

कारवाई मदत पथक - स.फौ.सुरेश पाटील, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.जनार्धन चौधरी, पो.ना.किशोर महाजन, पो.ना.सुनिल वानखेडे, पो.ना.ईश्वर धनगर, पो.कॉ.प्रदिप पोळ, पो.कॉ .सचिन चाटे, पो.कॉ.प्रणेश ठाकूर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत