मध्यरात्री लागली घराला आग, कुटुंब झोपलेले, पहाटे पाहिलं तर..
मध्यरात्री लागली घराला आग, कुटुंब झोपलेले, पहाटे पाहिलं तर..
अन सुंदर स्वप्नांच्या संसाराची राखरांगोळी झाली, अशी म्हणण्याची वेळ भंडारा जिल्ह्यात एका कुटुंबावर आली आहे.
महा घडामोडी न्यूज नेटवर्क, भंडारा : राज्यात दिवसेंदिवस आगीच्या घटनांही समोर येत आहेत. त्यातच आता भंडारा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भंडारा जिल्ह्यातील सिंदपुरी येथे लागलेल्या आगीत संपूर्ण घर जळून खाक झाले. मध्यरात्रीची घडलेल्या या आगीच्या घटनेने मोठे नुकसान झाले आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण -
अन आगिने आणला संसार उघड्यावर, अशी म्हणण्याची वेळ भंडारा जिल्ह्यात एका कुटुंबावर आली. भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातंर्गत येणाऱ्या सिंदपुरी येथील जितेंद्र कटरे यांच्या घराला रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत संपूर्ण घर जळून खाक झाले. अद्याप या आगीचे कारण अस्पष्ट असले तरी शार्ट सर्किटमुळे आग लागल्याच्या प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
जितेंद्र हे आपल्या कुटुंबासह रात्री गाढ झोपेत होते. मात्र, तेवढ्यात अचानक घराला आग लागली. जितेंद्र यांना याची भनकही लागली नाही. संपूर्ण घर आगीच्या कवेत गेले असतांना सकाळी 4 वाजेच्या सुमारास घराशेजारी असलेल्या व्यक्तीला आग दिसताच त्यांनी आरडाओरड करत परिसरातील नागरिकांना एकत्र केले. तसेच जितेंद्र यांना आवाज दिला. तेवढ्यात जितेंद्र यांना जाग आली आणि ते आपल्या कुटुंबासह घराबाहेर निघाले.
यावेळी आगीने घराला आपल्या कवेत घेतल्याचे त्यांनी पाहिले. मात्र, गावकऱ्यांना काही कळण्याच्या आधीच संपुर्ण घर जळून खाक झाले होते. या आगीत जितेंद्र कटरे यांच्या घरातील जीवनावश्यक वस्तू सह संपुर्ण घर जळाले आहे. फक्त त्यांच्या अंगावरील कपडे तेवढे वाचले आहे. त्यामुळे शासनाने त्वरित पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी पीडित कुटुंबीयांनी केली आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत