Breaking News

गुडसेला ग्राम पंचायतीच्या भोंगळ कारभाराची चौकशी करा - प्रशांत मोरे

 गुडसेला ग्राम पंचायतीच्या भोंगळ कारभाराची चौकशी करा - प्रशांत मोरे

गट विकास अधिकारी यांना निवेदन देऊन केली मागणी

महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी, शेख हक्कानी, जिवती : तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या गुडसेला ग्राम पंचायत मध्ये मागील 5 वर्षापासून मोठा आर्थिक गोंधळ चालू आहे.मागील पाच वर्षांपासून ग्रामस्थांना विश्वासात घेऊन कोणतेच काम केले जात नाही आहे.ही ग्राम पंचायत गट ग्राम पंचायत आहे.त्यामुळे मागील पाच वर्षांपासून ग्राम सेवक हे कोणतेही काम ग्राम सभेत मांडत नाहीत. जमा खर्च कधीच ग्राम सभेत सांगत नाहीत.एखादे काम आपल्या मर्जीने करतात.

गावात विविध समस्या पडलेल्या असताना काहीतरी थातुर मातुर कामे करून खर्च करीत असतात.ग्रामस्थांनी विचारणा केली की हे काम मागील दोन वर्षापूर्वी मंजूर झाले आहे.त्यावेळी दुसरा ग्राम सेवक होता.ते कामे मी पूर्ण करून घेत आहे असे सांगत असतो.आम्ही ग्रामस्थांनी आज पाच वर्षापासुन गावचा विकास आराखडा तयार केला नाही.आणि कधी ग्राम सेवक पण वाचून दाखवत नाहीत.ग्राम सभेत चर्चेला एक विषय घेतात आणि कोरम पूर्ण करून आपली मर्जिने कामे करतात खर्च करण्यासाठी तर ग्राम सभेला कधीच विचारणा केली जात नाही.

ग्राम सेवक गावात हफ्त्यात एकादी वेळी येतो तेही दुपारी तीन वाजता नंतर येतात.सविस जानेवारी ला ग्राम सभा घेणे गरजेचे असते त्यांनी ती घेतली पण तहकूब झाली मात्र त्यानंतर आज एक महिना उलटून गेला तरी त्यांनी ग्राम सभा घेतली नाही.गावात सीसी रोड चे काम सुरू असते पण ही बाब ग्राम पंचायत सदस्य याना देखील ग्राम सेवक न कळवता काम सुरू करतात.विचारणा केली असता हे मागील वर्षाचं काम आहे असे सांगतात.काही कामे अर्धवट अवस्थेत सोडून पैश्याची उचल केल्याचा प्रकार समोर आला आहे.ग्राम पंचायत म्हणते की अमुक ठिकाणी काम झाले आहे पण वास्तविकता त्या ठिकाणी तो रस्ताच दिसून येत नाही आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत