Breaking News

प्राथमिक शिक्षक सह. पतसंस्थेच्या नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार समारंभ संपन्न

 प्राथमिक शिक्षक सह. पतसंस्थेच्या नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार समारंभ संपन्न

महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, बुलढाणा : संबोधी बहूउद्देशिय संस्था चिखली च्या माध्यमातून दि. चिखली तालूका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था र.न.422 च्या नवनिर्वाचित अध्यक्ष तथा सन्माननीय संचालक यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संबोधी बहूउद्देशिय संस्थेचे अध्यक्ष आयु.व्ही.टी.गवई उपस्थित होते.प्रथम मान्यवरांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज,क्रांतीसुर्य ज्योतीबा फुले, राजर्षी शाहू महाराज तथा भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

दि चिखली तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष आद.सुरेश पैठणे यांचा शाल,पुष्पगुच्छ देऊन सह्रदय सत्कार करण्यात आला.त्याचप्रमाने पतसंस्थेचे माजी अध्यक्ष विष्णू झगरे,किशोर कणखर तथा सर्व नवनिर्वाचित संचालकाचा सत्कार करण्यात आला.माजी अध्यक्ष विष्णू झगरे तथा किशोर कणखर यांनी पतसंस्थेची कार्यप्रणाली व पतसंस्था ही सर्वांची आहे संस्थेच्या प्रगतीसाठी सर्वांनी प्रामाणिक प्रयत्न करायला हवेत असा आशावाद व्यक्त केला.तर संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष सुरेश पैठणे यांनी संस्थेच्या प्रगतीसाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे ही संस्था सर्वसामान्य सभासदांच्या आर्थिक अडिअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहील ही अपेक्षा व्यक्त केली.

 संस्थेच्या भरभराटीसाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवेत ही भावना व्यक्त केली.त्याचप्रमाने संचालक राम वाघ , विनायक धोंडगे, उर्मिला बावस्कर मॅडम यांनी आपले विचार व्यक्त केले.तर सन्माननीय संचालक रफिक सर , प्रभाकर पाटोळे सर, भगवान चेके सर,वर्षा सोळंकी मॅडम , विलास पवार सर तथा विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संबोधी संस्थेचे सदस्य आयु.दयानंद निकाळजे सर तर प्रास्ताविक आयु. एस एस गवई यांनी केले.आभार प्रदर्शन आयु.कैलास जाधव यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संबोधी बहूउद्देशिय संस्थेचे सर्व पदाधिकारी व सभासदांनी सहकार्य केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत