कुसळची यात्रा भाविकांना पडली महागात !
कुसळची यात्रा भाविकांना पडली महागात !
दुचाकीच्या अट्टल चोरांची टोळी सक्रिय,पोलिस प्रशासन मदतीला धावणार का ?
चोरांनी दोन पेक्षा जास्त दुचाकी लंपास केल्याची प्राथमिक माहिती
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, कोरपना : कोरपना तालुक्यातील कुसळ मध्ये असलेल्या बाबा दुल्हेशाहा सरकार यांच्या दर्गामध्ये दरवर्षी प्रमाणे दी. 05/03/2023 रोजी यात्राचे मोठ्या उत्साहाने नियोजन करण्यात आले होते.संपूर्ण जिल्ह्यातील मुस्लिम बांधवांसोबत इतरही बांधव मोठ्या श्रद्धेने इथे उपस्थित होतात.यात्रा असल्याने जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याची लोकांचा सहभाग इथे असतो. याचा फायदा चोरट्यांनी घेतला असून यात्रेत पार्किंग केलेल्या गाड्या चोरल्याची माहिती आहे.
दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा मोठ्या जल्लोषात कुसळ यात्रा चे नियोजन केले होते या यात्रेस जिल्ह्यातील बहुसंख्या लोक या यात्रेकरिता आले होते. मंडळाने वेगवेगळ्या ठिकाणी आपले स्वयंसेवक लावत व्यवस्थित नियोजन केले होते तसेच मंडळाने पार्किंग व्यवस्था सुद्धा केली होती. परंतू उपलब्ध करून दिलेल्या पार्किंगच्या जागी गाडी उभी केली असता. चोरट्यांनी दोन पेक्षा जास्त दुचाकी लंपास केल्याची घटना उघडकीस येत आहे. चोरटयांनी दुचाकी लंपास केल्याने मालकांची चांगलीच तारांबळ उडाली असून अजूनही दुचाकी शोध मोहीम सुरू असल्याचे कळते.
जत्रेत बहुसंख्य नागरीक येत असल्याने अशा घटनांना वाव मिळतात. त्यामुळे पोलिस प्रशासनाने चोरी चा घटनांना टाळन्या साठी आपला फौज फाटा जास्त व पोलिस मित्र लावण्याची गरज असते मात्र इथे असे दिसून येत न्हवते त्यामुळे ही अशा घटना घडत असल्याचे बोलले जात आहे. लंपास केलेल्या दुचाकी मालकांचा पोलीस प्रशासन मदतीला धावतील का.? की बघ्याची भूमिका घेतील या कडे नागरिकाचे लक्ष वेधले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत