Breaking News

बेला येथे कबड्डी सामन्याचे बक्षीस वितरण संपन्न

 बेला येथे कबड्डी सामन्याचे बक्षीस वितरण संपन्न

     महाराष्ट्रात लवकरच मध्यावधी निवडणुका होतील, - सुनील बाबू केदार

महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, बेला : बेला येथील कबड्डी सामन्याच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात बोलताना सुनील बाबू केदार म्हणाले की, महाराष्ट्राच्या राजकारणातील खळबळ बघता व खोक्याचे राजकारण करणाऱ्या राजकीय पक्षाचे भवितव्य अधांतरी आहे, त्यामुळे महाराष्ट्राला लवकरच मध्यावधी निवडणुकीला पुढे जावे लागेल, संघर्ष बहुउद्देशीय क्रीडा मंडळ बेला व ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या कबड्डी सामन्याच्या बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी सुनील बाबू बोलत होते,

    स्वर्गीय डॉक्टर शशिकांत जनार्दन झिले यांच्या स्मृतीत आयोजित केलेल्या कबड्डी सामन्याच्या समारोपीय कार्यक्रमात बेला ग्रामपंचायतचे नवनिर्वाचित सरपंच अरुण भाऊ बालपांडे व उपसरपंच प्रशांत बाबू लांबट यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सुनील बाबू केदार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

     या कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष मुक्ताताई कोकुर्डे, कुंदाताई राऊत उपाध्यक्ष जिल्हा परिषद नागपूर, अहमद बाबू सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती नागपूर, अवंतिका लेकुरवाळे सभापती महिला व बालकल्याण विभाग नागपूर, मिलिंद सुटे समाज कल्याण विभाग नागपूर, वंदनाताई बालपांडे सदस्य जिल्हा परिषद नागपूर बेला सर्कल, चेतन देशमुख सदस्य पंचायत समिती पारशिवनी, विष्णूजी कोकुर्डे सरपंच ग्रामपंचायत पिपळा डाग बंगला, सुरज कांबळे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती उमरेड, ठाणेदार अजित कदम, समाजसेवक प्रमोद घरडे, बेला ग्रामपंचायत ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य व मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.

साखळी पद्धतीने खेळण्यात आलेल्या वीस संघाने भाग घेतला होता या सामन्यामध्ये प्रथम पारितोषिक 300001 रुपयांचे रोख जय भवानी क्रीडा मंडळ यांनी पटकाविले, दुसऱ्या बक्षिसाची मानकरी भीमादेवी क्रीडा मंडळ भिवापूर वीस हजार एक रुपये रोख व ट्रॉफी, तिसरे बक्षीस दहा हजार एक रुपयांचे जय गजानन क्रीडा मंडळ नागपूर यांनी पटकाविले, मॅन ऑफ द सिरीज रेंजर सायकल साहिल शेख भिवापूर याला देण्यात आली, मॅन ऑफ द मॅच होम थिएटर साहिल मांढरे , उत्कृष्ट चढाईची ट्रॉफी सोनू पुरी संघर्ष क्रीडा मंडळ बेला याला, उत्कृष्ट पकड सुरेश ढोक भिवापूर, तर संपूर्ण संघामध्ये उत्कृष्ट संघ म्हणून ठरलेला श्री गजानन क्रीडा मंडळ नागपूर याला उत्कृष्ट संघाची ट्रॉफी देण्यात आली. 

    कबड्डी सारख्या मैदानी खेळाच्या माध्यमातून युवकांनी आपले आरोग्य सुदृढ करावे व कबड्डी मध्ये आपले भविष्य उज्वल करावे कारण खेळाडूंना सुद्धा नोकरीमध्ये आरक्षण आहे हे वंदनाताई बालपांडे यांनी स्पष्ट केले, कुंदाताई राऊत यांनी दिल्यामध्ये पुरुषांबरोबर महिलांचे सुद्धा कबड्डी सामने आयोजित केले जावे असे अपेक्षा व्यक्त केली, अवंतिका लेकुरवाळे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाची लक्तरे वेशीवर टांगली, मिलिंद सुटे यांनी सर्व खेळाडूंचेआभार मानले, प्रमोद घरडे यांनी सुनील बाबूंना विनंती केली की ग्रामीण भागातील युवकांकडे लक्ष देऊन त्यांच्या बेरोजगारीच्या हाताकडे काम द्यावे अशी मागणी केली.

     हे सामने यशस्वी होण्याकरता नागपूर येथून विलास भाऊ कापसे अविनाश भाऊ कापसे धनंजय बंगाली प्रवीण भाऊ देशमुख, तर बेला येथील विनोद शेंडे दीपक झगडे ,मोरेश्वर तराळे, अरविंद मेंडुले, मंगेश कारमोरे, अंकित लांबट, साहिल लांडे सौरभ लांबट, व इतर मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केले कार्यक्रमाचे संचालन राजेंद्र सूर्यवंशी यांनी तर आभार प्रदर्शन सुरज कांबळे यांनी केले.

संपादन : विनोदकुमार डांगरे, सोनेगाव

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत