शेकडो समर्थकासह रत्नदिप दहिवले करणार भाजपात प्रवेश ?
शेकडो समर्थकासह रत्नदिप दहिवले करणार भाजपात प्रवेश ?
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, संतोष रोकडे, अर्जुनी मोर. : काॅग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे कार्यप्रणालीवर ठपका ठेवत गोंदिया जिल्हा काॅग्रेस चे कार्याध्यक्ष रत्नदिप दहिवले यांनी 24 फेब्रुवारी ला कार्याध्यक्ष पदाचा राजिनामा महाराष्ट्र प्रदेश काॅग्रेस चे प्रभारी एच.के.पाटील यांना पाठविला आहे. आणी आता 4 मार्च ला अर्जुनी मोर.येथे आयोजित भाजपा मेळाव्यात ते भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे यांचे हस्ते शेकडो समर्थकासह भाजपामधे प्रवेश करणार असल्याची विश्वासनिय माहीती आहे.
अर्जुनी मोर. तालुक्यातील रत्नदिप दहिवले हे युवा अवस्थेपासुनच काॅग्रेस चे कार्यकर्ते राहीले होते.जिल्हा परिषद सदस्यासह काॅग्रेस पक्षाची लहान मोठी पदे त्यांनी भोगली आहेत.अनेक निवडणुका सुध्दा लढविल्या आहेत. मात्र काॅग्रेस पक्षात जोमाने कार्य करणा-या कार्यकर्त्यांची किमंत राहीली नसल्याने अखेर त्यांनी काॅग्रेस च्या निवडक नेत्यांच्या कार्यप्रणालीवर ठपका ठेवत राजीनामा दिला.
आणी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे तथा अर्जुनी मोर. विधानसभा क्षेत्रांची संपुर्ण जबाबदारी सांभाळणारे भाजपाचे जेष्ठ नेते व माजी मंत्री राजकुमार बडोले व डाॅ.परिणय फुके यांचे नेतृत्वावर विश्वास ठेवुन दहिवले हे 4 मार्च रोजी अर्जुनी मोर. येथे आयोजित भाजपाचे मेळाव्यात आपल्या शेकडो समर्थकासह भाजपामधे प्रवेश करणार असल्याची विश्वासनिय माहीती आहे. रत्नदिप दहिवले यांचे भाजपा प्रवेशामुळे अर्जुनी मोर. विधानसभा क्षेत्रांत भाजपाचे संख्याबळ वाढुन भाजपा अधिक मजबुत स्थितीत येईल असा विश्वास व्यक्त केल्या जात आहे.
दोन हजारच्या वर कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश
अर्जुनी मोर. विधानसभा अंतर्गत भारतिय जनता पार्टी चा भव्य कार्यकर्ता मेळावा 4 मार्च ला अर्जुनी मोर. येथे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे यांचे विशेष उपस्थिती मधे माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी आयोजित केला आहे. यामधे काॅग्रेस पक्षाचा राजीनामा दिलेले रत्नदिप दहिवले आपल्या दोनशे ते तिनसे कार्यकर्त्यांसह भाजपमधे प्रवेश करणार आहेत.तर संपुर्ण अर्जुनी मोर. विधानसभा क्षेत्राअंतर्गत येणा-या अर्जुनी मोर, सडक/अर्जुनी, व गोरेगांव तालुक्यातील जवळपास दोन अडीच हजार विविध पक्षाचे कार्यकर्ते भारतिय जनता पक्षाच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवुन भाजपामधे प्रवेश करणार असल्याची माहिती माजी मंत्री राजकुमार बडोले तथा अर्जुनी मोर. तालुका भाजपा अध्यक्ष विजय कापगते यांनी कळविले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत