कृषी विज्ञान केंद्र,पाल व महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान, मुक्ताईनगर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन साजरा
कृषी विज्ञान केंद्र,पाल व महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान, मुक्ताईनगर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन साजरा
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, मुक्ताईनगर : दिनांक : ०८ मार्च 2023 रोजी पंचायत समिती कार्यालय, मुक्ताईनगर व कृषी विज्ञान केंद्र, पाल यांच्या संयुक्त विद्यमाने नाट्य मंदिर, मुक्ताईनगर येथे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मा. खासदार रक्षाताई खडसे यांना कृषी विज्ञान केंद्र पाल मार्फत भरड धान्य उत्पादन तंत्रज्ञान पुस्तिका भेट देऊन महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी विविध विषयांवरती महिलांना मार्गदर्शन करण्यात आले भरड धान्य उत्पादन व महिलांसाठी कृषी क्षेत्रातील रोजगाराच्या संधी या विषयावर प्रा. महेश महाजन (वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख) यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेच्या दरम्यान मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्राचे आमदार माननीय चंद्रकांत भाऊ पाटील यांनी महिलांना मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे व्यासपीठावर कृषी विभाग, आरोग्य विभाग, महिला व बाल विकास अधिकारी व विधी सेवा प्राधिकरणाचे तज्ञ उपस्थित होते या कार्यक्रमाला मुक्ताईनगर तालुक्यातील मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या कार्यक्रमासाठी श्री पवन सुरवडकर यांनी उमेद अभियानाच्या माध्यमातून महिलांना प्रबोधन करण्याचे काम केले व सेंट्रल बँक ऑफ इंडिया मुक्ताईनगर शाखेच्या वतीने महिलांना बचत गटाच्या उद्योग उभारणीसाठी निधी मंजुरीचे पत्र वाटप करण्यात आले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत