वैचारिक परिवर्तनातून धम्मक्रान्ति चळवळ गतिमान करण्यास कटिबद्ध व्हावे - सभापति दिलीप भाऊ जाधव
कोळेगाव येथील बुद्धमूर्ति प्रतिष्ठापणा, धम्म मेळाव्यात प्रतिपादन
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, बुलढाणा : महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी हजारों वर्षाचा इतिहास केवळ 35-40 वर्षात बदलून या देशात चक्रवर्ती महान सम्राट अशोका नन्तर धम्मचक्र गतिमान करून, बुद्धाचा मानवतावादी, समता मूलक समाज निर्मितिची पायाभरणी केली, हिच धम्मक्रान्ति चळवळ वैचारिक परिवर्तनातून सिद्ध करण्यासाठी सर्वानी कटिबद्ध व्हावे ऐसे मत युवा भीमशक्ति मित्र मंडल , स्वराज्य मित्र मंडल ,उपासक उपासिका संघ कोलेगाव यांचे वतीने आयोजित भव्य बुद्धमूर्ति प्रतिष्ठापणा व विशाल धम्म मेलाव्यात व्यक्त केले.
मौ कोलेगाव येथे आयोजित सदर धम्म मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी विलास साळवे होते तर प्रमुख उपस्थिति धम्मगुरु भदंत दिव्यनाग जी ताडोबा चंद्रपुर, भंते कुलदीप, भंते दिव्यज्योति,भन्ते विनयपाल यांचे सह माजी अर्थ व बांधकाम सभापति, समाजभूषन दिलीपभाऊ जाधव, मा बीडीओ शिवाजीदादा गवई, मा थानेदार तथा समता सैनिक दल प्रमुख अशोकराव काकड़े, समता सैनिक दल मेजर एकनाथ बोर्ड, राजू लहाने, संतोष खरात,भगवान गवई औरंगाबाद, बौद्ध चार्य वानखेड़े , यांची विशेष उपस्थिति होती.
कार्यक्रमाच्या प्रारंभी भीखूसंघ यांचे वतीने वंदनेसह,धम्मध्वजारोहन करून संपूर्ण गावातून बुद्धमूर्ति ची मिरवणूक काढण्यात आली,समता सैनिक दल, महिला व पुरुष यांनी प्रदर्शन मार्च केले..हजारों उपासक उपासिका सफेफ वस्त्र परिधान करून शिस्तबद्धतेने जयघोषात गाव प्रदक्षना करण्यात आली.
धम्मदेशना सत्रात भीखूसंघ यांनी मार्गदर्शन केले तर दिलीपभाऊ जाधव, शिवाजी दादा गवई, लॉर्ड बुद्धा tv प्रतिनिधि पत्रकार गजेंद्र गवई , राऊत यांनी धम्म, संविधान, आजची युवा पीढ़ी धम्मसंस्कार,रोजगार, बाबत मार्गदर्शन केले.रात्रि भीम संध्या निल्या पाखरांची हा संगीतमय ऑरकेस्ट्रा ख्यातनाम गायक प्रा अरुणजी खरात व गायिका अस्मिता खरात यांनी रासिकांच्या प्रचंड प्रतिसदात सादर केला, कार्यक्रमाचे बहारदार सूत्र संचालन लॉर्ड बुद्धा टिव्ही प्रतिनिधि गजेंद्र गवई यांनी केले.सदर कार्यक्रमास परिसरातुन हजारों समाजबाँधव प्रचंड संख्येने उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत