भविष्यात व्यावसायिक प्रशिक्षण उपक्रम सुरू करण्याचा माझा मानस आहे. - सौ मिनाताई राहिंज
भविष्यात व्यावसायिक प्रशिक्षण उपक्रम सुरू करण्याचा माझा मानस आहे. - सौ मिनाताई राहिंज
महा घडामोडी न्युज नेटवर्क, अहमदनगर : ८ मार्च जागतिक महिला दिन सर्व धर्मांत महिलांना मानाचे स्थान आहे.आई, बहिण, बायको, मुलगी अशा भुमिका महिला साकारते. परंतू तिला माणूस म्हणून मान्यता मिळावी म्हणून जगभरातील विविध देशांत लढा द्यावा लागत आहे. यासाठी ज्यांनी पुढाकार घेतला त्यांचे स्मरण म्हणजे महिला दिन, भारतात कायद्याने महिलांना समान सन्मान दिला. या देशाची महिला पंतप्रधान होती. राष्ट्रपती होती, आजही केंद्रातील आघाडी सरकारचा रिमोट कंट्रोल सोनिया गांधींच्या रुपाने महिलेच्या हाती आहे,अशी ३३ टक्के नंतर ५० टक्के खऱ्या अर्थाने १०० टक्के आरक्षण महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेत मिळाले.
१०० टक्के म्हणण्याचे कारण म्हणजे महिला आरक्षण व्यतीरिक्त सर्व साधारण जागेवर ही पुरुषाच्या विरोधात महिला निवडणूक लढवू शकते. लष्करातही महिला भरती होत आहे. निवडणूकीत तिकीटही मिळवतानाा दीसते. तर क्रिकेट संघातही विकेट घेताना दिसते. महिलांच्या. या प्रगतीत तालुक्यातील राजकीय, बचत गट, महिला मंडळ आदी माध्यमातून कार्याचा ठसा उमटलेल्या व महिलांची यशोगाथा व त्यांना मिळालेली प्रेरणा त्यांचे ध्येय याबाबत विविध महिला नेत्याशी आमच्या प्रतिनिधी सौ मिनाताई राहिंज यांनी घेतलेला आढावा.
१२ वी पर्यंत शिक्षण घेतलेल्या राहिंजवाडी येथील सौ. मिनाताई राहिंज यांनी छोट्याश्या वाडीमध्ये राजमाता निराधार महिला आधार संस्था स्थापन करून महिलांचे संघटन केले. मेणबत्त्या, उदबत्ती, द्रोण, पत्रावळी बनविणे, आदी प्रशिक्षणातून महिलांना स्वयंरोजगार मार्ग दाखवला. १५० ते २०० महिला या मुळे स्वत ; च्या पायावर उभ्या राहू शकल्या. संस्थेने रक्तदान शिबीर देखील सामाजिक बांधिलकीतून घेतले. यातील जमा झालेले रक्त जनकल्याण रक्तपेढीला देण्यात आले.
सौ मिनाताई राहिंज अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेच्या महिला प्रदेशाध्यक्षा असून महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी अग्रेसर राहतात. महिलांचे प्रश्न सोडविणे, स्त्रीभुण हत्या रोखण्यासाठी प्रबोधन, व्यावसायिक प्रशिक्षणासाठी उपक्रम तसेच मार्गदर्शन करून महिलांचा जीवनस्तर उंचावण्याचे कार्यरत छोट्याश्या वाडीत करणे ही उपजत वृत्ती इतर महिलांना प्रेरणादायी आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत