Breaking News

लोकजीवन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

 लोकजीवन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा 

महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, विनोदकुमार डांगरे, बेला : बेला येथील लोकजीवन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्राचार्य सुनील मुलेवार अध्यक्षस्थानी होते. उपमख्याध्यापक मिलिंद शाव, प्रा. नितीन पुरी यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्व शिक्षक, शिक्षिका यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व सरस्वती मातेच्या प्रतिमांना पुष्प माल्यार्पण करण्यात आले.

विद्यार्थी,विद्यार्थिनींनी महिलांवर आधारित गीत गायन केले व भाषणे दिली. श्रद्धा साळवे, रंजिता तुरकर, निवेदिता उपलेंचेवार , नीलिमा मेंगरे आदी महिला शिक्षकांची भाषणे झाली. लोकजीवन शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा वर्षा बाभुळकर ,सचिव सुबोध देशमुख व प्राचार्य मुलेवार यांनी शाळेतील सर्व महिला शिक्षिका व विद्यार्थिनींना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे संचालन आरती मुलेवार यांनी केले. तर प्रा. नितीन पुरी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत