आदर्श शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिवस संपन्न.
२१ जून ला सकाळी सात ते नऊ या वेळेत योगा घेण्यात आला.संयुक्त राष्ट्रसंघाने २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस घोषित केल्यानंतर खऱ्या अर्थाने जागतिक पातळीवर योगाचे महत्त्व लक्षात घेऊन योग दिन साजरा करणे सुरू झाला. यावर्षी भारताला जी - २० चे अध्यक्षपद मिळाले असून "वसुधैव कुटुंबकम्" या संकल्पनेवर ‘एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ ही संकल्पना घेऊन संपूर्ण भारत भर परिषदा चालू आहेत, त्याचाच एक भाग म्हणून यावर्षीच्या योग दिवसाची संकल्पना भारत सरकारने "वसुधैव कुटुंबकम्" ठेवलेली होती.
प्राचिन परंपरा असणारी योग विद्या ही भारताने जगाला दिलेले वरदान आहे. बदलत्या जीवनशैलीमध्ये तंदुरुस्त राहण्यासाठी तसेच व्यक्तीच्या शारीरिक आणि आत्मिक विकासासाठी योगविद्या सहाय्यभूत आहे. कोरोना महामारीमधे सुदृढ शरीराचे महत्त्व आपण सर्वांनी जाणले आहेच त्यामुळे आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमाचे आयोजन हे प्रतिकात्मक न राहता प्रत्येक गावखेड्यामध्ये, शाळांमध्येयोगविद्येचा प्रसार व विकास कायमस्वरूपी होणे आवश्यक आहे योगाचे महत्व आणि योगदान पटवून देण्यासाठी योगाचा सराव सुरु ठेवण्यासाठी लोकांना प्रेरणा द्यावी असे प्रतिपादन एन. डी. नंदरधने यांनी केले.
तसेच सुदृढ पिढी निर्माण करणे हे योग दिनाचे उद्दिष्टे ठेवून नवव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करण्यात आले याचा विध्यार्थी, शिक्षक यांना नक्कीच उपयोग होईल असे मत मुख्याध्यापिका नलिनी पिंगे यांनी व्यक्त केले. उपस्थिताना योगाचे धडे व योगाचे महत्त्व पटवून दिले. यावेळी दीड ते दोन तास योगाची प्रात्यक्षिके करुन दाखविण्यात आली. या प्रसंगी जेष्ठ शिक्षिका ज्योती कल्लूरवार, रोशनी कांबळे, जयश्री धोटे, सुनीता कोरडे, अर्चना मारोटकर, रुपेश चिडे, राष्ट्रीय हरित सेना विभाग, स्काऊट -गाईड युनिट चे विध्यार्थी, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे सदस्य उपस्थित राहून योगाचे धडे घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बादल बेले यांनी केले तर आभार रुपेश चिडे यांनी मानले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत