अल्ट्राटेक कम्युनिटी वेलफेअर फाऊंडेशन कडून प्राथमिक आरोग्य केंद्र नांदाफाटाला 'शवपेटी' भेट
अल्ट्राटेक कम्युनिटी वेलफेअर फाऊंडेशन कडून प्राथमिक आरोग्य केंद्र नांदाफाटाला 'शवपेटी' भेट
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी,बिबी : ग्रामपंचायत नांदाफाटा व प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या मागणीनुसार अल्ट्राटेक कम्युनिटी वेलफेअरच्या सीएसआर निधीअंतर्गत नुकतेच नांदाफाटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला 'शवपेटी' भेट देण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत नांदा गावाच्या सरपंच मेघा पेंदोर, रत्नाकर चटप प्रकाश बोरकर, अल्ट्राटेक वेलफेअर चे एच.ओ.डी नारायण दत्त तिवारी, माईन्स चे एच.ओ. डी. बलराम सिंग,सी.एस.आर विभाग प्रमुख प्रतीक वानखेडे, आरोग्य अधिकारी डॉ.संकेत शेंडे, डॉ. योगेश मीना, भास्कर लोहबडे, प्रितम जक्कमवार, सचीन गोवारदीपे, देविदास मांदाळे ग्रामपंचायत पदाधिकारी व आरोग्य केंद्राचे कर्मचारी उपस्थित होते. आरोग्य केंद्राच्या वतीने अल्ट्राटेक कम्युनिटी वेलफेअर फाऊंडेशन आवारपूर व ग्रामपंचायत नांदाचे आभार मानले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत