Breaking News

उजळणी प्रशिक्षण मध्ये असलेल्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी घेतली चक्क रविवारी वनकर्मचारी मीटिंग

 उजळणी प्रशिक्षण मध्ये असलेल्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी घेतली चक्क रविवारी वनकर्मचारी मीटिंग 

महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी, जावेद पठाण, चिमूर : चिमूर तालुक्यातील ताडोबा बफर झोन अंतर्गत येणाऱ्या पळसगाव वनपरिक्षेत्राच्या वनपरिक्षेत्र अधिकारी हे चंद्रपूर वन अकादमी येथे उजळणी प्रशिक्षणकरिता दि. १२/०९/२०२३ पासून प्रशिक्षणासाठी असताना दि. २४/०९/२०२३ मात्र त्यांनी पळसगाव वनपरिक्षेत्रामधील कार्यरत असलेल्या वनकर्मचाऱ्यांची चक्क सुटीच्या दिवशी रविवारी वन परिक्षेत्र कार्यालयात मीटिंग घेतली. याबद्दल तर्क वितर्क काढण्यात येत असून वनपरिक्षेत्रात काही नवीन वनकामे मंजूर होऊन आलेली आहेत. त्या कामाचे बद्दल मीटिंग घेतली असल्याचे चर्चा आहे.

   मात्र सद्या पळसगाव येथील वनपरिक्षेत्राचा अतिरिक्त कार्यभार खडसंगी येथील वनपरिक्षेत्र अधिकारी धानकुटे यांच्याकडे आहे. हे मात्र विशेष आहे.पळसगाव वनपरिक्षेत्राचा कार्यभार / प्रभार दुसऱ्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांकडे असताना आपणच स्वतः येऊन मीटिंग घेणे उचित नाही.

   ते ही वनविभागाचे सरकारी वाहन वापरून मुल ते पळसगांव या गावात येऊन वनपरिक्षेत्र कार्यालयात मीटिंग घेणे हे न समजणारे कोडे आहे. सदर वन परिक्षेत्राचा अतिरिक्त प्रभार असणाऱ्या अधिकाऱ्याला याविषयी कळविले होते कां?

    या कृत्याबद्दल चंद्रपूर येथील वरिष्ठ वनधिकारी अशा अधिकाऱ्यांवर कारवाही करतील का ? असा प्रश्न पडला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत