उपजीविका व्यवस्थापकांच्या मानधनात वाढ करा (उमेद)
उपजीविका व्यवस्थापकांच्या मानधनात वाढ करा (उमेद)
महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी, शेख हक्कानी, जिवती : उमेद अभियानांतर्गत, ग्रामसंघाच्या वतीने काम करणारे कँडर तसेच तालुका व जिल्हा स्तरीय कर्मचारी यांच्या मानधनात वाढ करण्यात आली मात्र -उपजीविका व्यवस्थापकांच्या मानधनात वाढ करण्यात आली नसुन मानधनात वाढ करण्यात यावी .यासाठी उमेदसह ,प्रशासकीय यंत्रणेला निवेदन देण्यात आले आहे ग्रामसंघ अंतर्गत काम करणारे कँडर यांच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे.
तसेच तालुका व जिल्हा स्तरीय यांच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे परत प्रभागसंघ कार्य करणारे सर्व उपजीविका पशुधन व्यवस्थापक, कुषी व्यवस्थापक, मत्स्य व्यवस्थापक, प्रभाग व्यवस्थापक यांच्या मानधनात वाढ करण्यात आली नाही जिल्हा व राज्य स्तरावर उमेदच्या संघटन तयार करण्यात आल्या असुन प्रेरिका व कर्मचारी यांच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे मात्र यामध्ये प्रभाग स्तरावर काम करणारे उपजीविका व्यवस्थापकांच्या विचार करण्यात आलेला नाही.
तेव्हा या सर्वाच्या मानधनात वाढ करून किमान २२ हजार रुपये तसेच प्रवास व दैनिक भत्ता वेगळा करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे विशेष म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री, व ग्रामविकास मंत्री मानधनात वाढ करण्याचे आश्वासन दिले होते मात्र अद्यापही मानधनात वाढ करण्यात आली नाही.
त्या अंनुषशाने हे निवेदन देण्यात आले माननिय,भगवंत रेजिवाड गट विकास अधिकारी पं.स जिवती ,माननिय राजेश दुधे ता.अ.व्य.कक्ष जिवती.उपस्थित महिला कल्याणकारी संघटने ता अध्यक्ष यांचे नेत्रुवात श्रीमती, नंदाताई मुसने ,वैशाली ताई ब्राम्हणे, सुनिल राठोड, शामुल जोधळे, हंनुमत अलट ,अमोल शिन्दे यासह मोठ्या संख्येने उपजीविका व्यवस्थापक उपस्थिती होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत