नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेची पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धेचा बक्षीस वितरण समारोह संपन्न.
पर्यावरण संवर्धन व मानवता विकास ही लोक चळवळ झाली पाहिजे. - डॉ ओमप्रकाश गोंड
- नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेची पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धेचा बक्षीस वितरण समारोह संपन्न.
- घरगुती व सार्वजनिक मंडळांचा उत्स्फूर्त सहभाग.
- विविध विषयांवर केली गणेश भक्तांनी जनजागृती.
महाघडामोडी न्युज नेटवर्क राजुरा तालुका प्रतिनिधी :लोकेश पारखी
राजुरा:नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था शाखा राजुरा च्या वतीने आयोजित पर्यवारणपूरक घरगुती, सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेचा बक्षीस वितरण समारोह राजुरा येथील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय येथील सांस्कृतिक सभागृहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. ओमप्रकाश गोंड, तहसीलदार, राजुरा यांची उपस्थिती होती. तर प्रमुख अतिथी म्हणून सिद्धार्थ पथाडे, विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष, रिपाई(आठवले), प्रशांत पाटील, प्राचार्य, महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, राजुरा, दिलीप सदावर्ते, नागपूर विभाग उपाध्यक्ष, नरेंद्र देशकर, जिल्हा उपाध्यक्ष, अनंत डोंगे, राजुरा तालुका अध्यक्ष आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी बोलतांना डॉ. ओमप्रकाश गोंड म्हणाले, चांगल्या विचारांचा वारसा आपण समोर नेला पाहिजेत. पर्यावरण संवर्धन ही लोकचळवळ असून विकास आणि पर्यावरण दोन्हीचा समन्वय साधून आपण प्रगती केली पाहिजे. सिद्धार्थ पथाडे म्हणाले, संपुर्ण विश्वाला पर्यावरणीय असमतोलपनाचा फटका बसत असून मानवी चुकांना तात्काळ दुरुस्त करावे लागेल अन्यथा पर्यावरणाची हाणीचे दुष्परिणाम आपल्या सर्वांनाच भोगावे लागेल. पर्यावरणपूरक सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेत प्रथम क्रमांक लोकमान्य गणेश मंडळ, द्वितीय क्रमांक ऍड. यादवराव धोटे कनिष्ठ महाविद्यालय, तृतीय क्रमांक विदर्भ गणेश मंडळ यांनी प्राप्त केला. घरगुती गणेशोत्सव स्पर्धेत गुणानुक्रमे प्रथम संतोष संघमवार, द्वितीय सौरव वामन वाटेकर, तृतीय रुद्र राहुल अवधूत आणि प्रोत्साहनपर प्रतीक संतोष कोकोडे, चंद्रशेखर खोके, केतन जुनघरे, आकाश रामचंद्र घटे या सर्व क्रमांक प्राप्त विजेत्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज तेलिवार यांनी केले. प्रास्ताविक बादल बेले यांनी केले तर आभार वर्षा कोयचाळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या पदाधिकारी, संघटक, सदस्य यांनी अथक परिश्रम घेतले. स्पर्धेचे विषय भरडधान्य जनजागृती, व्यसनमुक्ती जनजागृती, मिशन चांद्रयान जनजागृती, ऑनलाईन होणारी फसवणूक जनजागृती यावर उत्तम संदेश, देखावे स्पर्धकांनी सादर केले होते. यावेळी ज्योतिबा शाळेतील उपस्थित विध्यार्थीना बबलू चव्हाण महाराष्ट्र राज्य युवा अध्यक्ष यांनी बिस्कीट पॉकेट वितरित केले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत