मौल्यवान गारगोटीची अवैधरित्या तस्करी तस्करांना वनविभागाचा व पोलिस विभागाचा आशीर्वाद असल्याची चर्चा
तस्करांचे जिवती टू राजस्थान कनेक्शन
महा घडामोडी न्यूज तालुका प्रतिनिधी, शेख हक्कानी, जिवती : तालुक्यातील जंगलामध्ये आढळणारा पांढराशुभ्र चमकणारा दगडाची ओळख गारगोटी म्हणुन केली जाते, राष्ट्रीय बाजारपेठेत याची मोठ्या प्रमाणात मागणी व याला किंमतही आहे. याचाच फायदा घेत तालुक्यातील व गडचांदूर येथील अवैध धंदे करणाऱ्यां तस्करांनी आपला मोर्चा या अवैधरित्या गारगोटी धंद्याकडे वाढविला आहे. गोपनीय माहिती हाती लागली आहे की नाईक नगर चा तस्कर व या तस्कराचा पार्टनर मिळून राजस्थान जाऊन मोठ्या तस्कराकडून मोठी रक्कम उच्चल म्हणून आणली असल्याची खंमग चर्चा रंगली आहे. नाईक नगर च्या तस्करांने या अवैध धंद्यात लाखो रुपयांची माया जमवली असल्याची पण जोमाने परिसरात चर्चा सुरू आहे.
जिवती तालुक्यातील चोपणगुडा, पुनागुडा,नाईकनगर, गणेरी, कलगुडी, भाईपठार,कावळगोंदी,तुमरीगुडा,रेंगीगुडा, वन जंगलातुन दहा ते पंधरा मजुरामार्फत गारगोटी गोळा करून नाईकनगर येथील तस्करा कडे साठा करुन ठेवली जाते, हा नाईक नगरचा तस्कर दारू बंदी काळात अवैध रित्या दारू विक्री करत होता असे बोलले जात आहे आता तो वनविभागाच्या अधिकाऱ्यांना व पोलिसांना हाताशी धरून मौल्यवान गारगोटीच्या धंद्यात उतरला आहे अशी चर्चा पाटण परिसरात सुरू आहे.या मौल्यवान गारगोटीचा वापर शोभेच्या वस्तु बनविण्यासाठी केला जातो. मजुरांकडून गारगोटी विस ते पंचविस रुपये प्रति किलो दराने विकत घेवून तस्कर दलालांना शंभर ते दिडशे रुपये प्रति किलो दराने विकत असल्याची माहिती समोर आली आहे.
अशी होते गारगोटीची अवैध वाहतुक
गारगोटी गोळा जागोजागी ढिग जमा करून ते गारगोटीचे ढिग ट्रॅक्टर ने भरुन एका ठिकानी डंपिंग करून मग ट्रक आणि कंटेनरच्या माध्यमातुन जिवती तालुक्यातील नगराळा,माणिकगड,गडचांदूर आदिलाबाद, नांदेड औरंगाबाद व नाईकनगर, भेंडवी, बल्लारपूर, मार्गे औरंगाबाद व तेथुन राजस्थान राज्यातील जयपुर शहरामध्ये नेली जाते. हे तस्कर अदामदात मौल्यवान सागवान लाकडाची तस्करी करत असल्याची चर्चा ऐकू येत आहे.
गारगोटी तस्कर व दलालांनी वन विभागाच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना तसेच पोलिसांना हाताशी धरून हा अवैधरित्या गोरखधंदा अनेक वर्षांपासून सुरु असुन वन विभाग याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करत असल्याची चर्चा रंगत आहे. तस्कर तथा संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी चोर चोर मावसभाऊ असं बोलायला काहीच हरकत नाही. या तस्करांचे व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे मोबाईल काॅल रेकॉर्ड डिटेल तपासले तर नक्कीच गौडबंगाल समोर येणार अशी माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर तस्करांच्या जवळच्यांने दिली आहे.
वनविभाग वन संपतीची तस्करी करणाऱ्या तस्करांच्या मुस्क्या आवळणार का ? तस्कर तथा संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांचे कर्मचारीचे मधुर संबंध असल्याने दुर्लक्ष करून तस्करांना आशीर्वाद देणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत