प्रसिद्ध लेखक,साहित्यिक ना.गो.थूटे यांच्या समग्र जीवनाचा विद्यार्थ्याना करून दिला परिचय
प्रसिद्ध लेखक,साहित्यिक ना.गो.थूटे यांच्या समग्र जीवनाचा विद्यार्थ्याना करून दिला परिचय
महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी, खेमचंद नेरकर, वरोरा : लोकमान्य महाविद्यालय वरोरा च्या प्र.प्राचार्या जयश्री शास्त्री व त्यांच्या सहकारी प्राध्यापिका यांनी 'साहित्यिकांच्या भेटी' या अभिनव उपक्रमाअंतर्गत वरोरा शहराचे साहित्य भूषण,प्रसिद्ध लेखक ,कवी,आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त,माजी मुख्याध्यापक ना.गो.थुटे यांच्या निवासस्थानी भेट दिली.सदर भेटीत 25 विद्यार्थी सहभागी होत्या.या भेटीत त्यांना ना.गो.थुटे यांच्या संपूर्ण जीवन व साहित्य दर्शन घडविणारी चित्रफीत दाखविण्यात आली.त्यांच्या समग्र लेखनाचा विद्यार्थ्यांना करून देण्यात आला.
यामध्ये ना.गो.थुटे यांचे प्रकाशित साहित्यात 19 कवितासंग्रह,18 गद्य पुस्तके,06 मूल्य शिक्षणावरील पुस्तके,06 संपादित पुस्तके व इतर साहित्यिकांनी त्यांच्यावर लिहिलेली समीक्षात्मक,14संपादकीय पुस्तके,याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली.विद्यार्थिनेने ना.गो.थुटे यांना प्रश्न विचारून अधिकची साहित्यिक माहिती मिळविली .प्राचार्य जयश्री शास्त्री यांनी त्यांना महत्वपूर्ण माहिती विचारून भविष्यातील रूपरेषा याबद्दल त्यांना बोलते केले.महाविद्यालयाचे वतीने प्राचार्या शास्त्री यांनी थुटे सरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
थुटे सरांनी सुद्धा सर्व प्राध्यापकांचे स्वागत केले.साहित्यिक प्रश्नावर बरीच चर्चा रंगली,विद्यार्थ्यांनी ही दिलखुलास प्रश्न विचारून साहित्यातील आपली आवड अधोरेखांकीत केली.कार्यक्रमात भागवत शिवराम भोयर यांच्या गौरवपर कवितेतील 11,12 कडव्यांचे वाचन प्राचार्या शास्त्री ,प्राध्यापक वृंद तथा विद्यार्थिनीने केले.शेवटी प्रा.रजनीगंधा खिरटकर यांनी आभार मानले.ना.गो.थुटे यांनी अभ्यासपूर्ण माहिती देऊन सर्वांना शुभेच्छा दिल्या.लेखन साहित्य व पुस्तके देऊन तसेच महाविद्यालयाला त्यांचे आत्मचरित्र आयुष्याचा अभिलेख हे पुस्तक भेट देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत