Breaking News

अनुगामी लोकराज्य महाअभियान मेळाव्यात माजी आमदार संजय धोटे यांचे हस्ते श्रीराम मुर्ती वितरण सोहळा

अनुगामी लोकराज्य महाअभियान मेळाव्यात माजी आमदार संजय धोटे यांचे हस्ते श्रीराम मुर्ती वितरण सोहळा

महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, रविकुमार बंडीवार, नांदा फाटा : करोडो हिंदु बांधवांची आस्था असलेले प्रभु श्रीराम हे २२ जानेवारी रोजी अयोध्या येथे नव मंदिरात विराजमान होणार आहेत. या निमीत्य संपुर्ण भारतात भक्तिमय वातारणाची चाहुल लागली आहे. अनुगामी लोकराज्य महाअभियान (अनुलोम) या सामाजिक संस्थेव्दारे श्रीराम मुर्ती वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. माजी आमदार संजय धोटे कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी होते. अयोध्या येथे पवित्र श्रीराम मंदिर निर्माण आपणा सर्वांच्या साक्षिने होते आहे, ही आपणासाठी गर्वाची बाब आहे, २२ तारखेला आपण सर्व मिळुन दिपावली पर्व साजरे करूयात. असे आवाहन माजी आमदार संजय धोटे यांनी हनुमान मंदिर राजुरा येथे उपस्थितांना संबोधतांना केले.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कडुन ३२ वस्ती मित्रांना प्रभु श्रीराम यांची मुर्ती प्रदान करण्यात आली, तर माजी आमदार ॲड.संजय धोटे यांचे कडुन १५० स्थान मित्र व अनुलोम संवादिनींना मुर्ती प्रदान करण्यात आल्या. अनुगामी लोकराज्य महाअभियान ही एक सामाजिक संस्था असुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मार्गदर्शनाखाली काम करतात. केंद्र सरकार तथा राज्य सरकारच्या कल्याणकारी योजणांची पुर्तता करण्याचे कार्य संस्थेव्दारे केल्या जाते. संपुर्ण महाराष्ट्रात ही संस्था सामाजिक दायित्वाचे कार्य करीत असतात.

"घे भरारी" स्वरुपाने राजुरा भागातील कोरपणा,जिवती, गोंडपिपरी तालुक्यात संस्थेचे उल्लेखनीय सामाजिक कार्य आहेत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनुलोम समन्वयक सतिश मुसळे यांनी करून संस्थेची कार्यरचणा विशद केली. यावेळी उपस्थितांचे संबोधन झाले. कार्यक्रमाला भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सतिश धोटे, माजी भाजपा नेते जनार्धन निकोडे, माजी सरपंच बाबुराव जिवने, सामाजिक कार्यकर्ते सत्यपाल साळवे यांचे सह अनुलोम संवादिनी, वस्ती मित्र तथा स्थान मित्र उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन भाग जनसेवक प्रज्वल कन्नाके यांनी केले तर आभार प्रदर्शन संगीताताई होकम यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत