जिवती तालुक्यातील धोंडाआर्जुनी येथे शिवसेना शिंदेगट शाखा बाधनी व सदस्य नोंदणी
भारत बिरादार गणेश पवार यांच्या उपस्थितीत शाखा गठीत
महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी, हकानी शेख, जिवती : चंद्रपूर जिल्ह्यातील लास्टच्या टोकाला बसलेले जिवति तालुका तेलंगण ला लागुन तालुका जिवति येथे,दिनांक 15जानेवारी ला,महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तसेच पुर्व विदर्भ संघटक किरण पांडव, यांच्या आदेशान्वये आणि चंद्रपूर जिल्हा प्रमुख बंडू हजारे, यांच्या मार्गद्शनाखाली व तालुका प्रमुख भरत बिरादार, यांच्या नेतृत्वात धोंडाआर्जुनी ग्रामपंचायत मधे शाखा बांधणी करण्यात आली,व सदस्य नोंदणी करून गावकऱ्यांनी घरोघरी जाऊन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या योजना आपल्या पर्यंत पोहोचविण्याचा विश्वास दिला आहे.
येणाऱ्या काळात जिवति तालुक्यातील विविध कामे एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नातून यशस्वी करू आशि गावकऱ्यांना ग्वाही दिली आहे, प्रामुख्याने उपस्थित गावकरी लक्ष्मण भगवान पवार, आनंद मारोती पाचागे, गणेश तातेराव केदासे, नितीन भगवान राठोड, सखाराम भावराव पवार, शेषेराव कउकडवआड, संतोष केदासे, गावकरी उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत