Breaking News

जय दुर्गा विद्यालय गौरनगरच्या राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थ्यांनी जिंकली ग्रामस्थांची मने

 जय दुर्गा विद्यालय गौरनगरच्या राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थ्यांनी जिंकली ग्रामस्थांची मने

महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, संतोष रोकडे, गोंदिया : श्री गणेश बहुउद्देशीय संस्था अर्जुनी मोरगाव द्वारा संचालित जयदुर्गा विद्यालय गौरनगर येथे राष्ट्रिय सेवा योजनेचे पथक आहे. नुकतेच सात दिवसीय निवासीय शिबिर मौजा मांडोखाल टोला येथे पार पडले. या शिबिरामध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमअंतर्गत विद्यार्थी तसेच ग्रामस्थांना विविध विषयांवर तज्ञ मार्गदर्शकांचे मार्गदर्शन लाभले.

दिनांक सात जानेवारीला संस्था अध्यक्ष अशोक चांडक यांच्या अध्यक्षतेखाली उपविभागीय अधिकारी वरून कुमार शहारे, दानेश साखरे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.

शिबिरामध्ये तहसीलदार दंडाधिकारी अनिरुद्ध कांबळे यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी यावरती मार्गदर्शन केले तसेच कृषी व पशुसंवर्धन यावर रवींद्र लांजेवार, एस एस बडोले कृषी अधिकारी यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांनी सामाजिक दायित्व कसे निभावे यावर खंडविकास अधिकारी विलास निमजे यांनी मार्गदर्शन केले तर दिनांक 9 जानेवारीला भव्य रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते डॉ. प्रशांत झोडे डॉ.राजेश संग्ग्रामे तसेच यांनी याप्रसंगी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले व तपासणी केली यावेळी 150 ग्रामस्थांनी शिबिराचा लाभ घेतला. रस्ता सुरक्षा अभियान, व सायबर व बालगुन्हेगारी यावर विलास नाळे पोलीस निरीक्षक अर्जुनी मोरगाव यांचे मार्गदर्शन लाभले तर 12 जानेवारीला रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यात 21 शिक्षक व पालकांनी रक्तदान केले त्याच दिवशी महिला सक्षमीकरण यावर महिला मेळाव्यामध्ये क्षेत्राच्या जिल्हा परिषद सदस्य जयश्रीताई देशमुख, पौर्णिमा ताई ढेंगे, सविताताई कोडापे सभापती, पंचायत समिती सदस्य भाग्यश्री ताई सयाम अर्जुनी मोरगाव यांनी उपस्थित महिला व विद्यार्थांना मार्गदर्शन केले .

शिबिराच्या शेवटच्या दिवशी ग्रामगीता अभ्यासक मंडळ जिल्हाप्रमुख निमजे दादा, दुर्योधन जी मैद यांनी विध्यार्थी व ग्रामगीता यावर मार्गदर्शन केले.

शिबिराच्या सकाळच्या सत्रात योगशिक्षक कांतीकुमार बोरकर, क्रीडा शिक्षक नितीन गणवीर यांनी योग प्राणायाम याविषयी माहिती देऊन विद्यार्थ्यांकडून योगाभ्यास करून घेतला.

ग्राम स्वच्छता करतांनाच विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांसोबतच अंधश्रद्धा निर्मूलन, बेटी बचाव बेटी पढाव अशा विविध विषयांवर मनोरंजनासोबतच उद्बोधन पर कार्यक्रम सादर केले. संस्थेच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयातर्फे आयोजित या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

शिबिराचा समारोप दिनांक 13 जानेवारीला करण्यात आला यावेळी उपसभापती होमराज पुस्तोडे प्रामुख्याने उपस्थित होते.

संस्था अध्यक्ष अशोक चांडक, संस्था सचिव डॉ. राजेश चांडक विद्यालयाचे प्राचार्य सुनीलकुमार पाऊलझगडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर प्रमुख कार्यक्रम अधिकारी भूवेंद्र चव्हाण, सहाय्यक कार्यक्रमअधिकारी संघदीप कांबळे, ममता लंजे, यादव तरोने यांनी शिबिराच्या यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले

शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी गावच्या सरपंच हेमलताताई राऊत उपसरपंच मुरारी घोडेस्वार, ग्रामसेवक डी. बी पारधी,महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्ष वसंत लांडगे,माजी सरपंच भागवत राऊत ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल पुस्तोडे, श्रावण करपते, पालिकाताई घोडेस्वार, शालूताई करपते, वैशालीताई नाकाडे, विविध कार्यकारी सेवा समितीचे अध्यक्ष टिकाराम नाकाडे, श्यामू केसरवणी,राजू राऊत, राजूभाऊ चव्हाण,सत्यवान लांजेवार, गायत्री लांजेवार , देवराम लांजेवार, सिध्दार्थ घोडेस्वार, कल्याणी घोडेस्वार यांचे विशेष सहकारी लाभले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत