आनंद निकेतन कनिष्ठ महाविद्यालय वरोरा येथे युवक दिना निमित्त ' सायबर क्राइम आणि पोकसो कायदा ' विषयावर मार्गदर्शन
आनंद निकेतन कनिष्ठ महाविद्यालय वरोरा येथे युवक दिना निमित्त ' सायबर क्राइम आणि पोकसो कायदा ' विषयावर मार्गदर्शन
महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी, खेमचंद नेरकर, वरोरा : बारा जानेवारी हा दिवस युवा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवसाचे औचित्य साधून दिनांक 13/01/2024 ला वरील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. काळे सर, प्रमुख उपस्थिती सौ. राधा सवाणे तर प्रमुख वक्ते म्हणुन श्री. मुजावर अली, सायबर एक्स्पर्ट चंद्रपूर, श्री. रोशन इरपाचे पी एस आय कम्युनिटी सेल, चंद्रपूर, श्रीमती. संगीता हेलोंडे, सहायक पोलिस उपनिरीक्षक, वरोरा हे प्रामुख्याने उपस्थित होते.
श्री. अली सर यांनी विद्यार्थ्यांना ATM द्वारे होणारी फसवणूक, फिशिंग, हॅकिंग, या सर्व विषयाची माहिती विविध उदाहरणे देऊन व पावर पॉईंट चा वापर करुन समजाऊन सांगितले. श्री. इरपाचे सर यांनी पॉक्सो कायदा आणि मोबाइलचे दुष्परिणाम यावर सखोल माहिती दिली. श्रीमती. संगीता हेलांडे यांनी सुध्धा मुलांना मोलाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे आयोजन उपप्राचार्य राधा सवाने मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सांस्कृतिक विभागाचे प्रा. निलेश जोशी, डॉ. दीप्ती चिटणीस, यांनी अथक प्रयत्न केले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन प्रा. लता आत्राम यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. किरण लांजेवार यांनी केले. या कार्यक्रमाला 200 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. महाविद्यालयातील सर्व शिक्षकांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मदत केली.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत