Breaking News

श्री गुरू गोबिंद सिंघ जी यांची शिकवणीची,आदर्शाची प्रेरणा वर्तमान काळा मध्ये सर्वांनी घेणें गरजेचे

श्री गुरू गोबिंद सिंघ जी यांची शिकवणीची,आदर्शाची प्रेरणा वर्तमान काळा मध्ये सर्वांनी घेणें गरजेचे

महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, नांदेड : श्री गुरु गोबिंद सिंघ सिंघ यांच्या संपूर्ण जीवनातून आपल्याला प्रत्येक प्रकारचे अत्याचार आणि धर्मरक्षणासाठी अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा मिळते. सर्वांनाच वाटतं की, आपल्या नावाचीही इतिहासात नोंद व्हावी, या साठी आज पर्यंत च्या भारतीय इतिहासातील राज्य करणाऱ्या राजे लोकांनी कोणी आपल्या राज्य विस्तारा साठी तर कोणी सत्ता टिकवण्यासाठी,  तर कोणी दुसऱ्यांच्या वर सत्ता गाजवण्यासाठी,कोणी दुसऱ्यांच्या  स्त्रीयांना हस्तगत करण्यासाठी लढाईया लढल्याचे दिसून येईल. परंतु श्री गुरु गोबिंद सिंघ जी च्यां जीवनावर थोडी नजर टाकल्यास हे संपूर्ण जगातील एकमेव असे ऐतिहासिक पुरुष आहेत की त्यांनी कधीही जमीन, धन-संपत्ती, राजसत्ता-प्राप्ती किंवा यशप्राप्तीसाठी लढाई केली नाही. 

श्री गुरु गोबिंद सिंघ जी असे एक ऐतिहासिक पुरुष होते की. त्यांची लढाई अन्याय, अधर्म आणि अत्याचार आणि धर्मरक्षणासाठी अन्यायाविरोधात, सर्वांना न्याय मिळवून देण्यासाठी होती. श्री गुरु गोबिंद सिंघ हे शीख धर्माचे दहावे अंतिम देहधारी गुरू होय.  त्यांनी खालसा पंथाची स्थापना केली व या मध्ये जात पातीचे भ्रम दुर करत "मानस की जात  सबे एको पहचानबो" म्हणजे फक्त माणुसकी ही एकच जात आहे अशी शिकवण दिली, त्यांचा जन्म 1666 मध्ये पटना शहरात बिहार मध्ये  माता गुजरीजी व श्री गुरु तेगबहादुरजी यांच्या  कुटुंबात झाला. त्यावेळी गुरु तेगबहादुरजी बंगाल मध्ये होते.  गुरु तेगबहादर जीच्यां म्हणण्यानुसार गुरुजींचे  नाव गोबिंद राय असे ठेवण्यात आले होते.

 नंतर 1699 मध्ये बैसाखीच्या दिनी गुरु गोबिंद राय ह्यांनी श्री आंनदपूर साहीब पंजाब मध्ये भारतातील सर्व प्रांतातील शीख लोकांना बोलावून, या बाबतीत  माझ्या वैयक्तिक विचारा नुसार शीख म्हणजे श्री गुरू नानक देव जी शिकवण आत्मसात करून त्या वर चलणारे लोक व नेहमी काही ना काही शिकत असणारे लोक, म्हणूनच  श्री गुरु गोबिंद सिंघ जी संपूर्ण भारतातील लोकांना आंनदपूर साहीब ला येण्याचे आवाहन केले होते. विशेष लक्ष देण्याची एक गोष्ट म्हणजे त्या काळात नेट व जाण्यायेण्याच्या रस्त्याच्यां , वाहनाची सोय उपलब्ध नसताना विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे गुरु महाराजांनी संपूर्ण भारतात संदेश कसा पोहचविला असेल व लोकांना सभेचे स्थान (लोकेशन) कशी कळाली असेल हा एक संशोधनाचा विषय आहे. दुसरी गोष्ट म्हणजे पहीले गुरु श्री गुरु नानक देव जी महाराज नांदेड मार्गोने अनेक वर्षांपुर्वी  कर्नाटक राज्यात जाऊन  मानवतेच्या कल्याणकारी दृष्टिकोनातून आपली शिकवण तेथील लोकांना दिली होती. 

श्री गुरु नानक देव जी मध्ये कीती चांगल्या प्रकारे कोणत्याही भाषेतील लोकांना शिकवण देण्याची कला अवगत असेल कारण गुरु नानक देव जी च्यां अनेक वर्षानंतरही तेथील स्थानिक लोक गुरु नानक देव जी चीं शिकवणी वर चालत  श्री गुरु गोबिंद सिंघ जी महाराज जीं च्या निमंत्रणाला स्विकारून सकारात्मक साथ देत बिदर कर्नाटक मधील एक जत्था आनंदपुरला पहुचला. श्री गुरु गोबिंद सिंघ जी नीं सर्व जमलेल्या लोकांना आवाहन केले कि मला एका व्यक्तिची धर्मा खातीर बलीदान करणाऱ्या एका व्यक्तीची आवश्यकता आहे. जो कोणी आपला शिरछेद करून घ्यायला तयार आहे,

 त्यांनी पुढें यावे. इतिहासातील नोंदी प्रमाणे तेथे जवळपास सर्वच भागातील मिळून नव्वद हजार लोकांची  उपस्थिती होती. गुरु गोबिंद सिंघ जी च्यां धर्मासाठी स्वतः चे बलिदान देण्यासाठी कोण कोण तयार आहे अशी उद्घोषणा करत व प्रथम हातात तलवार व शोर्य रुप धारण करून आवाहन केल्यानंतर  सगळीकडे शांतता पसरली. दुसऱ्यांदा  आवाज दिल्यावर ही कोणी पुढे आले नाही. तिसऱ्यांदा गर्जना केल्यानंतर लाहोर चे रहिवासी भाई दयाराम जी पुढे हाथ जोडून उभे राहिले. दयाराम जी क्षत्रिय होते. या नंतर दयाराम जीनां आत तब्बुं मध्ये नेऊन रक्ताने माखलेली तलवार घेऊन गुरु महाराज उग्र रूप धारण करून बाहेर येऊन आणखी एका शिरच्या बलीदाना साठी आवाहन केले. 

या नंतर  दिल्ली चे जाट भाई धर्मदास से हे आपण  बलीदान देण्यासाठी तयार झाले.या नंतर भाई मोहकमचंद द्वारका निवासी शिंपी समाजाचे, नंतर बिदर कर्नाटक निवासी भाई साहिबचंद न्हावी समाजाचे, आणि भाई हिम्मतराय जी जगन्नाथ निवासी झीऊर जातीचे ( झीऊर म्हणजे शिकार करणारे) पुढे आलया ठिकाणी जात म्हणजे त्यांच्या कामा वरून जातीचा उल्लेख केला आहे.कारण गुरु नानक देव जी पासूनच जाती पातीला दुर करुन फक्त माणुसकी ही एकच जात आहे अशी सर्व नऊ गुरु महाराजांची शिकवण आहे. आपले बलिदान देण्यासाठी आलेल्या पांच लोकांची परिक्षा घेतल्या नंतर, नंतर शबद वाणी चे पठण करून ह्यांना अमृत पाजविण्याच्या तयार असतानां त्या ठिकाणी एक घटना घडली थोडे अमृताचे थेंब जमीनीवर पडले त्या थेबांना दोन चिमण्यानी पिऊन आपसात लढाई करून मरून गेले. हे दृश्य पाहून माता जीतो जीनीं गुरु गोबिंद सिंघ जीच्यां परवानगी ने अमृत मध्ये बताशे टाकले. 

कारण  शोर्याचा सोबत गोडवा ही कायम रहावा व यांचा उग्र रूप बनू नये.अमृत तयार करून पांच लोकांना अमृत पाजवून या सर्वांना खालसा म्हणून संबोधले. खालसा म्हणजे शुद्ध आचरण करणारा. (एकदम शुद्ध) सर्वांना खालसा पंथाची दिल्या नंतर नेहमी "क"  अक्षरांच्या पाच वस्तू बाळगून ठेवण्याचे निर्देश दिले. 

1) "केश" कोणीही कधीही शरीरातील कोणत्याही केशाचें कर्तन करून नये. माझ्या मते या मागचा गुरूजींचा उद्देश असेल केश हे शक्तिवर्धक गोष्टी चे प्रतीक आहे. आपण पाहीले तर पुरातन सर्व धर्मीय महापुरुष  ही कधी ही केश कापत नव्हते. 

2) "कडा" कडा हा शुद्ध लोखंडाचा असावा या मागचा उद्देश आपण कोणतेही काम हाताने करतो असे करताना कधी आपल्या कडुन काही चुकीच्या दिशेने काम करण्यासाठी हाथ पुढे झाले तर हा कडा आपल्याला आठवण करून देईल की मी खालसा पंथाची दीक्षा घेतलेला शीख आहे हे करने उचीत नाही. 

3) "कंघा" कंघा म्हणजे लाकडी कंगवा जेव्हा आपण केशाचें सांभाळ करत आहे तर ते नेहमी स्वच्छ ठेवण्यासाठी कंघा आवश्यक आहे. 

4) "किरपाण" तलवारीला किरपाण म्हणून संबोधले आहे. ही म्हणजे स्वतः च्या रक्षणासाठी व अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्यासाठी.  

5) "कछहरा‌" कछहरा म्हणजे शीख लोकांनी चढ्ढी ऐवजी घालणारे अंतर्वस्त्र, हा लांब पांढऱ्या शुभ्र कापडा पासून तयार करतात हा खुला असल्याचे शरीराच्या हालचाली करण्यासाठी फार उपयोगी व आरामदायी असतो. हा वेगळा पोशाख देण्याचा गुरु महाराजांचा उद्देश म्हणजे कधी ज्यांनी खालसा पंथाची दीक्षा घेतली. अशा शीख व्यक्ती कडून चुकून व्याभिचार करण्यासाठी प्रेरीत झाल्यास त्या गुरूजींनी दिलेल्या शिकवणीची जाणीव होण्यासाठी मदत मिळेल व असे दुष्कृत्य करण्यापासून त्यास परावृत्त होण्यास मदत मिळेल.           

पंजप्यारें साहेबांना खालसा पंथाची दीक्षा दिल्या नंतर गुरूजींनी काही पथ्ये व कटाक्षाने काही नियम पाळण्याची तसदी दीली. जसे की

1) पर पुरूष पर स्त्री सोबत कधीही व्याभिचार करू नये. पर पुरष व महिलांना आपले भाऊ, वडील व पर स्त्री ला आपली आई बहीण मानावे,

2) किरपाण ही स्वंरक्षण व दुर्बला वरती अन्याय अत्याचार होत असेल तर त्याच्या विरोधात उभे राहावे मग ते आपले असो किंवा दुसरे,

3) या पुढे कधी ही तंबाखू जन्य पदार्थ सेवन करु नये,या ठिकाणी एक उल्लेख करावासा वाटतो तीन शे वर्षो पूर्वी गुरु महाराजांची दूरदृष्टी कीती होती आज सर्वत्र तंबाखू मुळे कैन्सर व पर पुरष किंवा पर स्त्री सोबत शारीरिक संबंध बनविल्यास एड्स होत असल्याचे अनेक उदाहरणे दिसून येत आहे व सरकार तर्फे ही या बाबतीत जागृती मोहीम चालवलेली आहे.

4) या नंतर ची शिकवण म्हणजे कोणत्याही प्रकारचे हलाल केलेले मांस खाऊ नये, तसेच फक्त या ब्रम्हांड चालविणाऱ्या एका परेश्र्वराचीच आराधना करावी. आज पासून तुम्ही खालसा पंथाची दीक्षा घेणारे हे परमेश्वराचे बंदे आहेत आणि तुमची सदैव जीत निश्चित आहे . म्हणून  "वाहेगुरूजी का खालसा वाहेगुरूजी की फतेह"   हा नारा दिला  व या पाचही लोकांना पंजप्यारें म्हणून संबोधित करून खालसा पंथाच्या सर्वोच्च पदावर विभूषित केले. धर्माच्या बाबतीत सर्व निर्णय पाचही पंजप्यारें साहेबांनी एकमताने घेऊन जो निर्णय देतील तो या पुढे सर्व शीख समाजाच्या लोकांनी पाळने जरूरीचे आहे असे आदेश दिले.  

पुरुषांच्या नावा सोबत सिंघ म्हणजे सिंह  व महिलांच्या नावा सोबत कौर म्हणजे राजकुमारी  लावून सर्व सामान्य माणसामध्ये एक नवीन जोश संचारीत करून."सव्वा लाख से एक लढाऊं तबै  गोबिंद सिंघ नाम कहाऊं"म्हणजे. मी असा माणूस तयार करेन जो एकटा सव्वा लाख लोकांचा एकटा मुकाबला करण्यासाठी तयार असेल,अशी कथनी व करणी एक करुन दाखवून दिले, विशेष बाब म्हणजे आपल्याला संपूर्ण जगभरात एक ही असे उदाहरण पाहावयास मिळणार नाही जसे की श्री गुरु गोबिंद  सिंघ जी नी अमृत पाजवून पंजप्याऱ्यानां खालसा पंथाची दीक्षा देऊन" आपणास स्वतःला पंजप्यारें  साहेबांना खालसा पंथाची दीक्षा देण्यासाठी विनंती केली.  व स्वतः पंजप्यारें कडून अमृतपान करून गोबिंद राय पासून गोबिंद सिंघ झाले.

म्हणून श्री गुरू गोबिंद सिंघ जी ना "आपे गुरु चेला"  म्हणून सर्व शिख समाजात बोलल्या जाते.   संपूर्ण जगभरात असा एक ही उदाहरणं मिळणार नाही ज्यांनी स्वतःच गुरु असताना  व आपल्याच अनुयाया तर्फे धर्माची दीक्षा घेणारे एकमेव उदाहरण फक्त श्री गुरु गोबिंद सिंघ जी चे पाहावयास मिळते.त्यांचे बालपणाचे पाच वर्ष पटना येथेच गेले. 1675 मध्ये कश्मीरच्या ब्राम्हणांच्या विनंतीला मान देऊन श्री गुरु तेगबहादुरजींनी दिल्ली येथील चांदणी चौकात  हिन्दू धर्माच्या रक्षणार्थ स्वतःचे व स्वतःच्या त्यांच्या तीन शिष्यानी शहीदी पत्करून देहत्याग केला होता. श्री गुरु गोबिंद  सिंघजी 11नोव्हेंबर 1675 रोजी गुरु गादीवर विराजमान झाले. धर्म व समाजाच्या संरक्षणासाठी गुरु गोबिंद सिंघजी यांनी 1699  मध्ये खालसा पंथाची स्थापना केली होती.

 खालसा पंथाच्या माध्यमातून त्यांनी जातीय भेद नष्ट करून समानता प्रस्तापित केली. सर्व सामन्यात अन्याच्या विरोधात उभे राहण्या करीता व धर्म रक्षणासाठी नवीन जोश संचारीत करून सामर्थ्यवान बनवून दिले.शीख बांधवामध्ये आत्म-सन्मानाची भावना वाढीस लावली. गुरु गोबिंद सिंघ जी यांना तीन पत्नी होत्या. माता जीतोजी, माता सुंदरीजी व माता साहिबकौरजी अशी त्यांची नावे होती. बाबा अजित सिंघ जी, बाबा जुझार सिंघ जी ही त्यांची मुले होती. त्यांना चमकौरच्या युद्धात शहीदी प्राप्त झाली होती.  बाबा जोरावर सिंघ जी व फतेह सिंघ जी या लहान मुलांना सरहंदच्या नवाबने जिवंत भिंतींत पुरले होते. 

संपूर्ण जगभरात इतक्या कमी वयात धर्म रक्षणासाठी शहीदी पत्करण्याचे एकमेव उदाहरण पाहावयास मिळते. केशगड, फतेहगड, होलगड, आनंदगड व लोहगड हे किल्ले त्यांनी  स्वंता तयार केले होते. गुरुजी दररोज गुरूवाणीचे पठण करून आपल्या भक्तांना त्याचा सविस्तर अर्थही सांगत असत. श्री गुरु गोबिंद सिंघ जीनीं भाई मनी सिंघ जी च्यां हस्ते स्वंता आपल्या दैवी शक्ती च्या आधारे श्री गुरु ग्रंथ साहिब जी च्यां वाणीचे उच्चारण करुन संपूर्ण श्री गुरू ग्रंथ साहिब चे लिखाण करावयास लावले या साठी रोज गुरूजी वाणी उच्चारीत होते व भाई मनी सिंघ जी सतत लिहीत होते.

या साठी सतत नऊ महिने नऊ दिवसांचा कालावधी लागला. या अगोदर श्री गुरु ग्रंथ साहिब मध्ये फक्त पाच गुरु साहेबांची वाणी संमीलीत होती. श्री गुरु गोबिंद सिंघ जी नी नववे गुरु श्री गुरु तेगबहादर जीच्यां वाणीला संमीलीत करून गुरु ग्रंथ साहिब ला पुर्णत्व प्रदान केले. श्री गुरु गोबिंद  सिंघ जी यांनी आपल्या फक्त 42 वर्षाच्या जीवनातील अत्यल्प कारकिर्दीतील केलेल्या कार्या सारखे दुसरे उदाहरण मिळणें कठीण आहे. कारण गुरु गोबिंद सिंघ जी अनेक लढायांचा सामना करावा लागला. फक्त व फक्त धर्म रक्षणासाठी मग तो दुसऱ्या समाजाच्या धर्माच्या रक्षणार्थ हिन्दू धर्माच्या जनेवू ची रक्षा करण्याकरिता आपल्या संपूर्ण परिवाराची शहीदी देऊन लोकांना आप आपल्या धर्मा प्रमाणे चलता यावे असे एकमेव उदाहरण फक्त श्री गुरु गोबिंद सिंघ जी महाराजांचे मिळेल.  

या ठिकाणी एक घटनेचा उल्लेख करू इच्छितो की सर्वांनी आप आपले धर्माच्या ठरवून दिलेल्या शिकवणी च्या आधारे नियम काटेकोरपणे पालन करावे ही शिकवण देण्यासाठी.  गुरूजींनी एकदा त्या वेळच्या सर्व ब्राह्मण लोकांना भोजनासाठी आमंत्रित केले. खुप मोठ्या प्रमाणात याचे आयोजन केले, जेंव्हा सर्वांना पंगतीत बसविले तेव्हा सर्वांना एक ऑफर दिली जो कोणी मांसाहारी भोजन करेल त्याला पांच सोन्याच्या मुद्रा व जो शाकाहारी भोजन करेल त्याला फक्त एक सोन्याची मुद्रा दान मध्ये दीली जाईल.  

या मध्ये अनेक लोक सोन्याच्या मुद्रे खातीर मांसाहारी भोजन करू लागले. परंतु अनेक ब्राह्मण लालसेपोटी बळी न पडता आपल्या धर्माच्या नियमानुसार शाकाहारी भोजन चा आनंद घेत होते, जेव्हा सर्वांचं भोजन आटोपल्यानंतर गुरूजींनी ज्यांनी शाकाहारी भोजन केले होते त्यांना आदर सत्कार सन्मान देत पाच पाच मुद्रा दान दीले. ज्यांनी मुद्रा मिळवण्यासाठी आपल्या धर्माच्या नियमाला बगल करून घेतली अशांना गुरुजींनी फक्त एक एक मुद्रा देऊन सगळ्यांना शिकवण दिली लालसेपोटी अथवा भीती पोटी कधी ही आपला धर्म सोडू नये प्रत्येकानं आपापल्या धर्माचे काटेकोर पणे पालन करावे, गुरु गोबिंद सिंघ जी    यांना ब्रज , हिन्दी , पंजाबी, फारशी व अरबी भाषेत चांगले प्रभुत्व होते.  या शिवाय संत, योध्दा , कवी ,लढाई लढण्याच्या सर्व कला, चांगले प्रशासक, लढाई करण्यासाठी लागणारी रणनीती,  निधडक पणा, अध्यात्मिक बाबतीत परिपूर्ण असे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असणाऱ्या श्री गुरु गोबिंद सिंघ जी नी नांदेडच्या धर्तीवर येऊन इ स 1708 मध्ये त्यांनी आपल्या सतयुगातील तप स्थान उजागर करून वर्तमान नांदेड येथील संचखड गुरूद्वरा नांदेड येथील सतयुगातील तप स्थानात देहधारी गुरू परंपरेला विराम देत. 

ज्ञान रूपी मानवतेच्या कल्याणकारी अशा अटळ जागती ज्योत श्री गुरू ग्रंथ साहिब जी ला गुरू पदवी प्रदान केली होती. तसेच सर्वांना आदेश दिले आज पासून सर्वांनी श्री गुरू ग्रंथ साहिब जी नां गुरु मानुन गुरु ग्रंथ साहिब जी च्यां शिकवणी वर चालावे.  तसे श्री गुरू गोबिंद सिंघ जी चां स्वतः चा दशम ग्रंथ आहे. आम्ही नांदेडकरांचे सौभाग्य म्हणावे लागेल आपल्याला अशा सर्व गुण संपन्न अष्टपैलू व्यक्तिमत्त्व अवतार पुरूष श्री गुरु गोबिंद सिंघ जी च्यां पावन धर्तीवर राहण्याची संधी मिळाली.आज श्री संपूर्ण भारताला श्री गुरू गोबिंद सिंघ जी च्यां आदर्श व शिकवणीची खुप गरज असल्याचे भासत आहे.

कारण आज वर्तमान काळात बहुतांश लोक आपल्या धर्माच्या शिकवणीच्या विरूद्ध जाऊन आपल्या स्वार्थापोटी धर्माच्या शिकवणीच्या पासून दिवसेंदिवस दुर होत असल्याचे दिसून येते. आज गुरू गोबिंद सिंघ जी च्यां जयंती निमित्त जर त्यांची शिकवण व आदर्श प्रत्येकाने आत्मसात करून त्या वर चालण्याचा प्रयत्न केला तर खऱ्या अर्थाने श्री गुरू गोबिंद सिंघ जी चीं जयंती साजरी केल्या सारखी होईल. 


 लिखाणात काही चुक झाल्यास क्षमस्व. राजेंद्र सिंघ नौनिहाल सिंघ शाहू इलेक्ट्रिकल ट्रैनंर नांदेड 7700063999

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत