पाठलाग करुन महिलकडे केली शरीरसुखाची मागणी, कोर्टाने सुनावली दोन वर्षांची शिक्षा
पाठलाग करुन महिलकडे केली शरीरसुखाची मागणी, कोर्टाने सुनावली दोन वर्षांची शिक्षा
महा घडामोडी न्यूज नेटवर्क कमलेश खोब्रागडे नागपूर: पाठलाग करून महिलेला शरीरसुखाची मागणी करणाऱ्या आरोपीस येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. टी. वानखेडे यांनी दोन वर्षांचा सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. हा निर्णय शनिवारी (ता. १६) दिला. नितीन देवराजपुरी मुलतानी (वय २५, रा. किन्ही, ता. गोंदिया) असे आरोपीचे नाव आहे.
याबाबत सविस्तर असे की, २१ ऑक्टोबर २०१७ रोजी सकाळी नऊच्या सुमारास पीडित महिला ही गावाच्या बाहेर झुडपी जंगलात शौचास गेली होती. यावेळी आरोपी नितीन मुलतानीने तिच्या मागे मागे सायकलने जाऊन तिला शरीरसुखाची मागणी केली. पीडित महिलेने ही बाब तिच्या घरच्या लोकांना सांगितली व त्याच दिवशी रावणवाडी पोलिसांत आरोपीविरूद्ध तक्रार दाखल केली होती.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश वानखेडे यांनी आरोपीविरूद्ध सरकारी पक्षाचा पुरावा व सरकारी वकिलांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून आरोपी नितीन मुलतानी यास दोन वर्षांचा सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास १ महिन्याचा अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावली.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत