Breaking News

शेअर मार्केटमध्ये ऑनलाइन गुंतवणुकीच्या नावाखाली ५३ वर्षीय व्यक्तीची फसवणूक, २३ लाखांचा घातला गंडा

 शेअर मार्केटमध्ये ऑनलाइन गुंतवणुकीच्या नावाखाली ५३ वर्षीय व्यक्तीची फसवणूक, २३ लाखांचा घातला गंडा

शेअर मार्केटमध्ये ऑनलाइन गुंतवणुकीच्या नावाखाली ५३ वर्षीय व्यक्तीची फसवणूक, २३ लाखांचा घातला गंडा

महा घडामोडी न्यूज नेटवर्क कमलेश खोब्रागडे नागपूर:शेअर मार्केटमध्ये ऑनलाइन गुंतवणुकीच्या नावाखाली खासगी काम करणाऱ्या ५३ वर्षीय इसमाची २३ लाखांनी फसवणूक केली. याप्रकरणी सुभाष कुमार, कृष्णमोहन शाहू (रा. रूख्मणी किसन अपार्टमेंट, गणेशपेठ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी सायबर चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुभाष शाहू हे १५ जानेवारीला घरी असताना, त्यांना मोबाईलवर ‘सी९ब्लॅकरॉकटॉक पुलअप ग्रुप’मध्ये ॲड करण्यात आले. यावेळी त्यांना फोन करून शेअर बाजारात पैसे गुंतविल्यास चांगला नफा मिळेल असे सांगण्यात आले. त्यावरून शाहू यांनी ऑनलाइन गुंतवणुकीमध्ये वेळोवेळी २३ लाखांची गुंतवणूक केली.

प्रथम त्यांना चांगला नफा देण्यात आला. मात्र, त्यानंतर नफा देणे बंद केल्याने त्यांनी फोनवर संपर्क केला असता, तो बंद असल्याचे आढळून आले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे कळताच, त्यांनी सायबर पोलिस ठाणे गाठून दिलेल्या तक्रारीवरून आयटी अॅक्ट अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलिस आरोपींचा शोध घेत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत