Breaking News

कोंबड्यांच्या संपर्कातील ८९ कर्मचारी निगेटिव्ह, दोघे कोविड पॉझिटिव्ह; आरोग्य मंत्रालय सक्रिय

 कोंबड्यांच्या संपर्कातील ८९ कर्मचारी निगेटिव्ह, दोघे कोविड पॉझिटिव्ह; आरोग्य मंत्रालय सक्रिय




महा घडामोडी न्यूज नेटवर्क कमलेश खोब्रागडे नागपूर:
 बर्डफ्लू’च्या पार्श्वभूमीवर कोंबड्यांच्या संपर्कातील ९१ कर्मचाऱ्यांची तपासणी एम्समध्ये करण्यात आली. यातील ८९ कर्माचारी निगेटिव्ह आले. तर दोघांना कोरोनाची लागण झाली असल्याचे पुढे आले. यामुळे एकच खळबळ उडाली

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे दोन सदस्यीय पथक तीन दिवसांपासून उपराजधानीत विविध विभागात तपासणी करीत आहे. त्यांनी प्रादेशिक अंडी उबवणी केंद्राची पाहणी केली.

संक्रमित कोंबड्यांच्या संपर्कातील कर्मचाऱ्यांना प्रतिबंधात्मक औषधांची मात्रा देण्याची सूचना केली. मेडिकलमध्ये भेटीदरम्यान दोन दिवसांत ९१ कर्मचाऱ्यांचे नमुने घेऊन अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेकडे (एम्स) नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. या तपासणीत ८९ कर्माचारी निगेटिव्ह आले. तर दोघांना कोरोनाची लागण झाली

नागपुरात अंडी उबवणी केंद्रात कोंबड्यांमध्ये बर्ड फ्लूचे संक्रमण आढळल्यावर येथील ८ हजार ५०१ कोंबड्या, १६ हजार ७७४ अंडी, ५ हजार ४०० किलो पक्षी खाद्य नष्ट करण्यात आले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत