पालकांनो पाल्यांचा शाळेमध्ये प्रवेश घेत असाल तर याची खात्री करून घ्या, अन्यथा
पालकांनो पाल्यांचा शाळेमध्ये प्रवेश घेत असाल तर याची खात्री करून घ्या, अन्यथा
महा घडामोडी न्यूज नेटवर्क कमलेश खोब्रागडे नागपूर : नवीन शैक्षणिक वर्षासाठी शाळांमधील प्रवेशाला सुरुवात झाली आहे. मात्र, शहर आणि जिल्ह्यातील अनेक अनधिकृत शाळा शासनाने बंद केल्या असतानाही त्या शाळांकडून पालकांची फसवणूक केली जात असल्याच्या घटना समोर आल्या. त्यामुळे शाळांना मान्यता आहे की नाही, याबाबत खात्री करावी, तसेच सदर मान्यता कोणत्या शिक्षण मंडळाची (राज्य, सीबीएसई, आयसीएसई) आहे, याची खात्री केल्यानंतरच प्रवेश घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार यांनी केले आहे.
क्षेत्रीय अधिकारी, उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, शिक्षणविस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख यांनाही तशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात अनधिकृत शाळा सुरू होणार नाही, याची दक्षता घ्यावी. सुरू झाल्यास अशा शाळा तत्काळ बंद करण्यात याव्यात. प्रशासकीय बाबी पूर्ण करूनही शाळा बंद होत नसल्यास संबंधित शाळांवर गुन्हे नोंदविण्यात यावे व याबाबत पालकांना अवगत करण्यात यावे, असे निर्देश गटशिक्षणाधिकारी व शिक्षणविस्तार अधिकाऱ्यांना देण्यात आले
आहेत.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत