Breaking News

नागपुरच्या टोळीयुद्धाचं कारण काय? गोळीबार करणाऱ्या शादाब खानला कोठडी

 नागपुरच्या टोळीयुद्धाचं कारण काय? गोळीबार करणाऱ्या शादाब खानला कोठडी

 महा घडामोडी न्यूज नेटवर्क कमलेश खोब्रागडे नागपूर: गोवंशच्या तस्करीतून कपिलनगरातील कामगारनगरात सोनू बंदर ऊर्फ शेख इमरान याच्या टोळीवर शेख शादाब वल्द शेख गुलाब याच्या टोळीने शुक्रवारी पहाटे गोळीबार केला. सोनुने शादाबला गोवंश विकणे बंद करीत सिंडिकेट तोडून दुसऱ्याकडे अधिकच्या पैशात विक्री सुरू केल्याने हा हल्ला झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

सोनू बंदर ऊर्फ शेख इमरान अब्दुल सत्तार शेख (वय २३, रा. कामगारनगर, नारी रोड, कपीलनगर) हा अमजद शेख वल्द शब्बीर शेख, वसिम नसिम खान, आरान वल्द मख्तार शेख यांच्यासह मोमीनपुऱ्यातून कामगारनगर येथे जात होता. तो पेट्रोल भरण्यासाठी कामठी मार्गावरील मोहम्मद अली पेट्रोल पंपावर गेला.

तेव्हाच मागून शादाबसह सहा ते सात जणांनी इनोव्हा कारमधून येत पिस्तुलासह तलवारी आणि इतर घातक शस्त्र काढून सोनूला शिवीगाळ केली. पिस्तूलातून सोनू बंदरवर तीन गोळ्या झाडल्या. मात्र, नेम चुकल्याने बचावला सोनू व त्याचे तीन मित्र पसार झाले. मात्र, अमजद शेख वल्द शब्बीर शेख तावडीत सापडला. त्याच्यावर शादाबने वार केले आणि पसार झाले. पोलिसांनी शादाबला मोमीनपुऱ्यातील डोबीनगरातून अटक केली. त्याचे साथीदार फरार आहेत. (Latest Marathi News)

सोनू बंदर हा गोवंश तस्करीच्या कामात असून तो काही वर्षांपासून शाबाद याला गोवंशची विक्री करायचा. मात्र, काही महिन्यांपासून सोनू बंदर याने शादाबला मालाची विक्री बंद करून बाबू खान याला अधिक पैशात विक्री सुरू केली. त्यामुळे दोघांत भांडण सुरू झाले. त्याचा राग त्याच्या मनात होता. त्यातून त्याने हल्ला केल्याचे समजते. सध्या शादाबला अटक करण्यात पोलिसांना यश आले असून त्याला शनिवारी जिल्हा सत्र न्यायालयात हजर केल्यावर न्यायालयाने त्याची सोमवारपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली.

शेख शादाब वल्द शेख गुलाब हा रेकॉर्डेड आरोपी असून त्याच्यावर कळमेश्‍वर येथे सहा, हिंगणघाट येथे दोन तर कोंढाळी, कुही येथे प्रत्येकी एक गुन्हा दाखल आहे. या सर्व गुन्ह्यात तो फरार होता. दरम्यान या सर्व तस्करीची टीप सोनू बंदरने दिल्याचा शादाबचा संशय होता. त्यामुळेही शादाबने हल्ला केल्याचे समजते. 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत