गडकरींना वाटते त्यांची ‘ही’ कामे नागपूरमध्ये ‘गेमचेंजर’ ठरतील
गडकरींना वाटते त्यांची ‘ही’ कामे नागपूरमध्ये ‘गेमचेंजर’ ठरतील
महा घडामोडी न्यूज नेटवर्क कमलेश खोब्रागडे नागपूर : गेल्या दहा वर्षांमध्ये नागपूर लोकसभा मतदारसंघात एक लाख कोटींची कामे केली. भुयारी मार्ग, उड्डाणपूल, काँक्रिटचे रस्ते अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. या भागातील विकासकामे निवडणुकीत ‘ गेम चेंजर’ ठरतील, असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवार येथे व्यक्त केला.
वाठोडा येथील हॅरिसन लॉनमध्ये आयोजित भाजपा बुथ शक्ती केंद्र आणि पदाधिकारी संमेलनात नितीन गडकरी बोलत होते. यावेळी आमदार कृष्णा खोपडे, आमदार प्रवीण दटके, भाजपचे शहराध्यक्ष बंटी कुकडे, माजी आमदार प्रा. अनिल सोले, बाल्या बोरकर, संदीप गवई, सेतराम सेलोकार, धर्मपाल मेश्राम, श्री. प्रमोद पेंडके, . देवेंद्र दस्तुरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. या संमेलनाला पूर्व नागपुरातील कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ना. श्री. गडकरी म्हणाले, ‘मी लहानपणी या भागातून फिरलो आहे. त्यावेळी रस्त्यांची अवस्था वाईट होती. आज अतिशय उत्तम रस्ते झाले आहेत. या भागात सिम्बॉयसिससारखी संस्था आली. पिण्याचे पाणी सर्व वस्त्यांमध्ये पोहोचले आहे. आता तर आणखी ८९ जलकुंभ संपूर्ण नागपुरात होत आहेत. त्याचा फायदा गोरगरीब जनतेलाच होणार आहे, असे गडकरी म्हणाले



कोणत्याही टिप्पण्या नाहीत