Breaking News

महामंडळाच्या बसेस न थांबविनाऱ्या बस चालक व परीचालकांवर होणार कारवाही

विसापूर फाटा येथे महामंडळाच्या बसेस न थांबविनाऱ्या बस चालक व परीचालकांवर होणार कारवाही

श्री.मा.आ.सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्याकडे संदीप पोडे यांचे निवेदनात्मक तक्रार

महा घडामोडी न्यूज प्रतिनिधी, बल्लारपूर : विसापूर फाटा येथे ST महामंडळ चा बसेस न थांबवणाऱ्या बस ड्रॉयव्हर व कॅनडक्टर  यांच्यावर कारवाही करण्याची मागणी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हा महामंत्री संदीप भाऊ पोडे यांनी निवेदना मार्फत केलेली आहे के सदर निवेदना मध्ये यांनी खालील माहिती सन्मा. सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्याकडे दिलेली आहे,

मु. पो. विसापूर  ता. बल्लारपूर  जी. चंद्रपूर  येथील विसापूर फाटा येथे सुपर - बस  थांबा आहे, परंतु अनेक बसचे ड्रायव्हर व कंडक्टर नागरिकांना बस थांबण्याकरता सहकार्य करत नाही, व उद्धट बोलण्याचे कार्य करतात  या गैरसोई मुळे अनेक विसापूर वासिया  नागरिकांना त्रास सहन करावा लागतो, तरी आपणाकडे विनंती आहे की अशा उद्धटपणे कार्य करणाऱ्या ड्रायव्हर व कंडक्टर वर कारवाई करण्यात यावी या प्रकरची विनंतीमय मागणी संदीप भाऊ पोडे यांनी केलेली असून या वर देखील सन्मा. आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार  लवकरच तोडगा काढणार आहे


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत