Breaking News

माणिकगड पहाडावरील जिवती तालुक्यात विकासाच्या नावावर कोट्यावधी रुपयांच्या चुराडा ?

 माणिकगड पहाडावरील जिवती तालुक्यात विकासाच्या नावावर कोट्यावधी रुपयांच्या चुराडा ?

महा घडामोडी न्यूज जिल्हा प्रतिनिधी हकानी शेख ,चंद्रपूर :- माणिकगड पहाडावरील जिवती तालुक्याच्या विकासासाठी शासनाने प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, जल जीवन मिशन योजना व इतरही योजनेच्या माध्यमातून भरभरून निधी उपलब्ध करून दिली आणि त्या निधीच्या माध्यमातून सन २०२२,२०२३,२०२४ या कालावधी  तालुक्यातील रस्त्याचे काम भरपूर प्रमाणात झाले. परंतु रस्त्याचे काम निकृष्ट भोगस दर्जाचे झाल्यामुळे तालुक्यातील रस्त्याची पार वाट लागली आहे. आज घडीला तालुक्यात रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी अवस्था रस्त्याची झाली आहे. 

रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळे डांबरीकरण उकडून गिट्टी पसरलेली असून रस्त्यावरून वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. वाहनधारकांना खूप त्रास सहन करावे लागत आहे. भारी बाबापुर या रस्त्याला लागून शेळवाई या गावाकडे जाणाऱ्या नवीन रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत सुरू असून बोगस निकृष्ट दर्जाचे काम होत असल्यामुळे या तरी रस्त्याचे काम चांगले दर्जेदार व्हावे म्हणून या नवीन रस्त्याच्या कामाची बातमी महा घडामोडी न्यूज पोर्टल मध्ये ("त्या रस्त्याच्या दर्जोन्नतीच्या कामात चोरीचे मुरूम महसूल विभागाच्या आशीर्वादाने वापरला जात आहे. रस्त्याचे काम बोगस दर्जाचे अभियंताचे दुर्लक्ष कंत्राटदार मालामाल रस्त्याचे होणार बेहाल") दिनांक २० फेब्रुवारी २०२४ रोजी या मथळ्याखाली बातमी प्रकाशित करण्यात आली होती.

 म्हणून जिवती तहसील चे तहसीलदार यांनी बातमी वाचून महा घडामोडी न्यूज पोर्टलचे जिल्हा प्रतिनिधी हकानी शेख यांच्या व्हाट्सअप नंबर वर मॅसेज केला ("कोणता रस्ता आणि अशी चुकीची न्यूज का दिली") लोकशाहीमध्ये पत्रकारांनी भ्रष्टाचाराच्या विरोधात बोगस व निकृष्ट दर्जाच्या कामाच्या विरोधात तसेच तालुक्यात जे अवैध धंदे चालू आहे त्या विरोधात, अन्याय अत्याचाराच्या विरोधात आपल्या लेखणीच्या माध्यमातून बातमी प्रकाशित केली तर पत्रकाराचा गुन्हा काय ? पत्रकाराला व्हाट्सअप मेसेज च्या माध्यमातून दम देण्यात येत आहे. 

जिवती तालुक्यात होत असलेले अवैध उत्खनन, चोरीच्या रेतीच्या विरोधात, महसूल खात्यातील गैरव्यवहाराच्या विरोधात,अवैध धंद्याच्या विरोधात, बोगस निकृष्ट दर्जाच्या कामाच्या विरोधात, जिवती तालुक्यातील पत्रकारांनी वर्तमानपत्र, पोर्टल, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या प्रकाशित केल्यामुळे तहसीलदार दम देत असणार तर हे तर लोकशाहीचा अपमान आहे. पत्रकारांच्या लेखणीच्या अधिकारावर गदा आणण्याचे काम दिसून येत आहे.

 चंद्रपूर जिल्ह्यात, जिवती तालुक्यात अवैधरित्या रेतीची तस्करी केली जात आहे. अवैधरित्या मुरुमाची तस्करी केली जात आहे. हे मौल्यवान खनिज महसूल विभागाच्या अधिपत्यात येते. म्हणून पत्रकार आपल्या लेखणीच्या माध्यमातून महसूल विभागाच्या आशीर्वादाने, महसूल विभागाची चांदी असं लिहिणं चुकीचे आहे का? जिवती तालुक्यात फेरफटका मारल्यास रेतीचे ढिगारे दिसतात. रेती घाटाचे लिलाव झाले नाही तर तालुक्यात मोठ्या प्रमाणात रेती कुठून येत आहे? याचे उत्तर तहसीलदार मॅडमने द्यावे? रेतीच्या अभावामुळे

जल जीवन मिशनचे कामे अपूर्ण राहिले आहे. तालुक्यातील घरकुलाची कामे अपूर्ण राहिले आहे. काही घरकुल लाभार्थ्यांनी काम सुरू केले नाही याचे कारण चोरीची रेती असल्यामुळे रेतीचे दर गगनाला भिडले आहे. रेती विकत घ्यायला परवडत नाही म्हणून घरकुलाचे काम जल जीवन मिशनचे काम ठप्प झाले आहे. रेती बंद असूनसुद्धा जिवती तालुक्यात दररोज रात्री हायवा ट्रकच्या सहाय्याने रेती आणली जात आहे. यावर महसूल विभागाचे दुर्लक्ष म्हणावे का अर्थकारण म्हणावे ?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत