Breaking News

नाना नानी पार्कसमोरील मोठ्या खड्ड्यांमुळे एका व्यक्तीला जीव गमवावा लागला

लवकरात लवकर संबधीत ठेकेदार व कंत्राटदार वरती कारवाई करा अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा मनसे रुग्णमित्र कृष्णा गुप्ता यांनी दिलेला आहे.

महा घडामोडी न्युज जिल्हा प्रतिनिधी, शेख हक्कानी, चंद्रपूर : महाकाली कॉलनी परिसरात नाना नानी पार्क समोरील एका मोठ्या खड्ड्यांमध्ये दिनाक.१९/०३/२०२५ ला रात्रीचा सुमारे सात ते आठ वाजताच दरम्यान महाकाली कॉलरी प्रकाश नगर येथे राहणारे चिंताराम देवांगन हे नेहमीच प्रमाणे आपल्या रस्त्याने नाना नानी पार्क समोरील जात होते पण रात्रीची वेळ असल्यामुळे  त्या रोडवरील असलेला खड्डा त्यांना दिसलेला नाही व खड्ड्यामध्ये पडून त्यांचा मृत्यू झाला "त्यांचा तो शेवटचा दिवस ठरला. त्या खड्ड्यांमुळे अनेक अपघात झालेले आहेत व एकाचा जीव सुद्धा गेलेला आहे.

अशाप्रकारे आणखी अपघात टाळण्याकरीता लवकरात लवकर त्या परिसरामध्ये असलेल्या व चंद्रपूर शहरांमध्ये सर्वत्र खोद काम करून रस्ता फोडून ठेवलेला आहे लवकरात लवकर काम पुर्ण करण्यात यावे व कॅन्टीन चौक ते बायपास रोड वरील रस्त्याचे काम अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे ते काम लवकरात लवकर पूर्ण करावे व येना जाण्याकरिता रस्ता लवकरात लवकर सुरू करण्यात यावा व संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी व खड्डे बुजवण्यात यावे या मागणीला घेऊन २६/०३/२०२५ ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रुग्णूमित्र कृष्णाभाऊ गुप्ता,  व जिल्हा सचिव किशोर भाऊ मङगुलवार व  जिल्हा उपाध्यक्ष मनविसे कुलदिप चंदनखेडे, प्रविन शेवते, राकेश पडारकर, राजु देवांगन, प्रशांतभाऊ रामटेके, राहुल बेसेकर, निखील दुर्ग, रोहीत कन्नाके उपस्थित होते.

चंद्रपूर शहरातील महानगरपालिका आयुक्त सराना  व  बांधकाम विभाग (PWD) यांना सुद्धा निवेदन देण्यात आले. व येत्या सात ते आठ दिवसांमध्ये काम न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपला पद्धतीने आंदोलन करण्याचा इशारा महानगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी) विभाग यांना दिलेला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत