आदर्श शिक्षकी वृत्तीचा सन्मान: सुभाष पावडे सरांना साने गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार
आदर्श शिक्षकी वृत्तीचा सन्मान: सुभाष पावडे सरांना साने गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार
महा घडामोडी न्युज जिल्हा प्रतिनिधी, शेख हक्कानी, चंद्रपूर/गोंडपिपरी : गोंडपिपरी तालुक्यातील परसोडी येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे श्री. सुभाष दत्तूजी पावडे सर यांना यंदाचा साने गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील योगदानाची दखल घेत हा प्रतिष्ठित पुरस्कार त्यांना प्रदान केला जाणार आहे.
सुभाष पावडे सरांचा प्रवास आणि योगदान:
त्यांचे जन्मगाव विरुर स्टेशन असून, सध्या ते राजुरा येथे वास्तव्यास आहेत. ते राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेचे केंद्रीय सदस्य तसेच गोंडपिपरी तालुका ग्रामगीता जीवन विकास परीक्षा समितीचे तालुकाप्रमुख म्हणून कार्यरत आहेत.
त्यांनी सिंधी आणि कोहपरा येथील शाळांना अनुक्रमे 'स्वच्छ-सुंदर शाळा' आणि 'मॉडेल स्कूल-चेतना शाळा' म्हणून मान्यता मिळवून दिली. तसेच, 2023-24 मध्ये परसोडी येथील जिल्हा परिषद शाळेला 'उत्कृष्ट शाळा' पुरस्कार मिळवून दिला. हा पुरस्कार मा. विवेक जान्सन, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
त्यांनी 1998 पासून श्री गुरुदेव सेवा मंडळ, विरुर येथे सक्रिय सदस्य म्हणून कार्य केले आहे. त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील नवोपक्रम आणि समाजहिताच्या कार्यामुळेच त्यांना हा मानाचा पुरस्कार देण्यात आला आहे.
पुरस्कार सोहळा आणि सन्मान:
हा पुरस्कार 6 व 7 मार्च 2025 रोजी सांगडी मंडल-बेला, जिल्हा आदिलाबाद येथे होणाऱ्या 19व्या आंतरराज्यीय राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलनात प्रदान केला जाणार आहे. या पुरस्काराचे स्वरूप मानपत्र, मानवस्त्र आणि रोख रक्कम असे आहे.
शुभेच्छुकांचे अभिनंदन संदेश:
त्यांच्या निवडीबद्दल अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. त्यामध्ये प्रभाकर नवघरे (स्वागताध्यक्ष), ॲड. राजेंद्र जेनेकर, डॉ. श्रावण बानासुरे, लटारु मत्ते, ॲड. सारीका हिरादेवे, सुनीता पावडे, ज्ञानेश्वर मोरे, विश्वास सूर, सुरेंद्र चोथले, अनिल पिदूरकर, राजकुमार चिंचोळकर, बाबाजी लेडांगे, पिटर मॅडम, मनोहर बोबडे श्री शंकर धाबेकर केंद्र प्रमुख,श्री विठ्ठल गोंडे सर ,श्री सचिन बावणे अध्यक्ष अखिल म.शिक्षक संघ,कु.पिकी पिटर मॅडम, कु.शैला भोगेकर मॅडम,श्री प्रेम खोब्रागडे सर,श्री महेश अल्लेटीवार सर,श्री प्रमोद उरकुडे सर,श्री राजकुमार चिंचोलकर सर,श्री विनोद ढोबे सर , आदींचा समावेश आहे.
सुभाष पावडे सरांना त्यांच्या उज्ज्वल कार्यासाठी आणि मिळालेल्या सन्मानासाठी परिसरातून मोठ्या प्रमाणात शुभेच्छाचा वर्षाव होत आहे!



कोणत्याही टिप्पण्या नाहीत