Breaking News

माणिकगड पहाडावरील रस्त्याची दूर्दशा , अनेक रस्ते झाले जीवघेणे

कंत्राटदाराला वाचविण्यासाठी संबंधित बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

महा घडामोडी न्यूज जिल्हा प्रतिनिधी, शेख हक्कानी, जिवती :- तालुक्यातील प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना आणि अनेक योजनेतून गाव तिथे रस्ता असे शासनाचे धोरण आहे. या धोरणानुसार शासनाने तालुक्यात रस्त्याचे जाळे पसरविले असून काही गावाला रस्ते जोडण्यात आले नसल्याचे चित्र सध्या घडीला दिसून येत आहे. परंतु मागील काही वर्षापासून तालुक्यातील ग्रामीण भागाला जोडणाऱ्या रस्त्याची अवस्था बिकट झाल्यामुळे डागडुजी करण्यात आले नसून तालुक्यातील अनेक रस्त्याची वाट लागली असून हे रस्ते आता जीवघेणे ठरत आहे. 

या मार्गावर एकना अनेक अपघात झाले आहे. परंतु संबंधित प्रशासनाला जाग आली नसल्याचे उदाहरण रस्त्याच्या अवस्थेवरून दिसून येत आहे. तालुक्यातील पुनागुडा, भाईपठार, पाटण, कोलांडी, नंदप्पा, संगणापुर, शंकर पठार, भारी, शेणगाव ,सोरेकासा, मराईपाटण, बाबापुर, टेकामांडवा, चिखली, लेंडीगुडा, नागापूर, धोंडा अर्जुनी,पालडोह, जिवती,लोलडोह,कुंभेझरी,गुडशेला,शेडवाही,येल्लापूर आदी या मार्गावर असंख्य खड्डे पडल्याने हे मार्ग खड्ड्यात गेले आहे. अनेक ठिकाणी गिट्टी पसरली असल्यामुळे व मोठमोठ्या खड्ड्यातून वाहन चालकांना वाहन चालविताना अडचणीच्या सामना करावा लागत आहे. गाव तिथे रस्ते असे शासनाचे धोरण या खराब रस्त्यामुळे फुसका बार निघाला असल्याचे बोलके चित्र रस्त्याचे खड्ड्यामुळे दिसून येत आहे. तालुक्यातील अनेक गावचे रस्ते आखेरच्या श्वास मोजत आहे. तालुक्याच्या काही गावात तर जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. 

अनेक रस्त्याचे दोषदायीत्व कालावधी संपली नसून देखभाल दुरुस्ती कडे संबंधित विभाग जाणून बुजून ठेकेदाराला वाचविण्याकरिता दुर्लक्ष करीत असल्यामुळे रस्त्याची दुरुस्ती झाली नाही. रस्ता निर्माण झाला आणि कामाचे बिल निघाले की त्या रस्त्याच्या देखभालीकडे दुर्लक्ष केल्या जात असल्याने तालुक्यातील असंख्य रस्त्याची अक्षरशा वाट लागली आहे. रस्ते देशाच्या विकासाच्या व दिल्ली ते ग्रामीण भागाच्या गाव खेड्यात पर्यंत जोडण्यासाठी कणा मानल्या जात असून. ग्रामीण भागातूनच विकासाची गंगा शहरात पोहोचत असते. परंतु ग्रामीण भागातील नागरिकांना चांगले रस्तेही मिळू नये ही चिंतेची बाब असून याकडे संबंधित प्रशासनाने लक्ष देऊन तालुक्यातील रस्त्याची दुरुस्ती करावी जीवघेणे रस्त्यापासून लोकांचे जीव वाचवावे अशी मागणी तालुक्यातील जनतेने केली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत