Breaking News

....मुलीची छेड काढू नको, समजवायला गेलेल्या वडिलांची निर्घृण हत्या

मुलीची छेडछाड थांबवण्याचा प्रयत्न करणाऱ्या वडिलांची निर्घृण हत्या

महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, नागपूर : नागपूर मधील महाल इथले प्रकरण शांत होताच परत एकदा वातावरण सुन्न करणारी घटना इमामवाडा भागात घडली आहे. कर्फ्यु नंतर एकंदरीत नागपुरातील प्रत्येक चौकात पोलीस प्रशासनाने बंदोबस्त ठेवला आहे, जेणेकरून परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये, तरीही प्रशासनाच्या डोळ्यात धूळ झोकून, मुलीची छेड काढण्याला विरोध केला म्हणून वडिलांची नागपूरच्या जट्टारोडी परिसरातील भर चौकात निर्घृणपणे हत्या करण्यात आली. संपूर्ण प्रकरण असे की, काही गुन्हेगार मुलीला सतत त्रास देत होते, म्हणून वडिलांनी याचा विरोध केला, तेव्हा आरोपींनी भर रस्त्यात वडिलांची हत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव नरेश वालदे असून ते 53 वर्षांचे होते. नरेश वालदे यांचा रंगकामाचा व्यवसाय होता. कुटुंबातील सदस्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार काही तरुण बऱ्याच काळापासून नरेश यांच्या मुलीला त्रास देत होते, मुलीने हे घरी सांगितल्यानंतर नरेश यांनी या मुलांना विरोध केला, तेव्हा त्यांचे आरोपींसोबत वाद झाले. यानंतर आरोपींनी नरेश यांना जीवे मारण्याची धमकी दिली.

बुधवार, 26 मार्चला नरेश वालदे त्यांच्या कामात व्यस्त असताना त्यांना एका अनोळखी नंबरवरून फोन आला आणि जट्टारोडी परिसरात भेटायला बोलावलं, यानंतर नरेश तिथे गेले असता आरोपी आधीच तिथे टपून बसले होते. नरेश दिसताच आरोपींनी धारदार शस्त्रांनी हल्ला केला आणि पळून गेले. हा हल्ला इतका जीवघेणा होता की नरेश यांचा जागीच मृत्यू झाला.

नरेश वालदे हे त्यांच्या वृद्ध आई व तीन मुलींसह इमामवाडा परिसरात राहतात. आरोपी हा मुलीला बऱ्याच दिवसांपासून त्रास देत असल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आली असता, या दोघांमध्ये या विषयी वाद ही झाला होता, याच दरम्यान साधारण काही दिवसांआधी पीडित मुलीच्या घरावर काही अज्ञात लोकांनी दगडफेक ही केली होती. यासंदर्भात इमामवाडा पोलीस स्टेशन ला नरेश तर्फे तक्रार दाखल करण्यात आली, परंतु पोलीस प्रशासनाने कुठलाही पाऊल (ठोस कारवाई) न उचलता प्रकरणाला वाढोवा दिला, आणि पूर्ण भरपाई नरेश यांना आपला जीव गमावून द्यावी लागली.

हत्येनंतर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट-4 ने तपास सुरू केला आणि दोन आरोपींना अटक केली. आरोपींची नावं निलेश उर्फ नाना मेश्राम आणि इश्वर उर्फ जॅकी सोमकुवार अशी आहेत. पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत