Breaking News

पोहण्याचा बेत जीवावर बेतला : तलावात बुडून पाच युवकांचा मृत्यू

 पोहण्याचा बेत जीवावर बेतला : तलावात बुडून पाच युवकांचा मृत्यू

महा घडामोडी न्युज जिल्हा प्रतिनिधी, शेख हक्कानी, चंद्रपूर / नागभीड : धूळवळी नंतर तलावात पोहण्यासाठी गेलेल्या पाच मित्रांचा खोल पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड येथील घोडाझरी तलावात घडली आहे.जनक गावंडे , यश गावंडे, अनिकेत गावंडे, तेजस गावंडे, तेजस ठाकरे अशी मृतकांची नावे आहेत.मृत्यू पावलेले पाच मित्र चिमूर तालुक्यातील साठगाव-कोलारी येथील आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले.या दुःखद घटनेने जिल्हात शोककळा पसरली आहे.

प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यातील प्रसिद्ध घोडाझरी तलावात पोहण्याचा आंनद घेण्यासाठी चिमूर तालुक्यात येणाऱ्या साठगाव-कोलारी गावातील पाच तरुण आज दुपारचा सुमारास आले होते.आहे.जनक गावंडे , यश गावंडे, अनिकेत गावंडे, तेजस गावंडे, तेजस ठाकरे या पाच जीवलग मित्रांनी पोहण्यासाठी तलावात उडी घेतली.पाण्याचा अंदाज न आल्याने पाच मित्र बुडाले. घटनेची माहिती पोलीस विभागाला देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून बुडालेल्या पाच तरुणांचा शोध सुरु केला आहे.आहे.स्थानिक मच्छीमारांची मदत पोलीस विभागाने घेतली आहे.पोलिसांचा शोध मोहिमेला यश आले असून बुडालेल्या पाच तरुणांचे मृतदेह सापडले आहे.

जिल्हात शांततेत आणि उत्साहात पार पडलेल्या होळी सणावर या घटनेने दुःखाचे विरजन ओतले आहे.दरम्यान पुढील तपास नागभीड पोलीस करीत आहेत.

पाचही मृतदेह काढण्यात आले…

घटनास्थळी नायब तहसीलदार उमेश कावळे , ठाणेदार कोकोटे , माजी जि.प.सदस्य संजय गजपुरे , तालुका कॅांग्रेस कमिटी अध्यक्ष प्रमोद चौधरी, नागभीड नगरपरिषदेचे माजी सभापती सचिन आकुलवार , यांच्यासह शेकडो नागरिकांनी गर्दी केली होती. 

   आमदार बंटीभाऊ भांगडिया यांनी प्रशासनाशी संपर्क साधून याबाबत माहिती घेतली व ॲम्बुलन्सची व्यवस्था करुन दिली. मृतदेहांचे पोस्टमार्टम करुन घरच्यांच्या देणार आहेत. मृतांपैकी किशोर गावंडे यांचा एक मुलगा जनक सनफ्लॅग कंपनी वरठी भंडारा येथे नोकरीवर होता तर लहान भाऊ यश नागपूरला इंजिनिअरिंग च्या अंतिम वर्षाला होता. अर्नव इंगोले हा या घटनेत वाचला आहे.

आजच्या घोडाझरी तलावात झालेली दुर्घटना वेदनादायक आहे. पाण्याच्या खोलीचा अंदाज नसल्यामुळे ही घटना घडली. त्या परिसरात मोठ्या प्रमाणात विविध कामांसाठी खड्डे खोदण्यात आले आहेत. प्रशासनाने अशा ठिकाणी माहिती फलक लावून प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. पण माहिती नसलेल्या ठिकाणी युवकांनी सुद्धा अतिउत्साहात आततायीपणा करुन जीव धोक्यात घालू नये . 

    - संजय गजपुरे, नागभीड, माजी जि.प.सदस्य, चंद्रपुर

बातमी संकलन : योगेश शेंडे, नागभिड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत