यशवंतराव चव्हाण आवास योजनेतील लाभार्थ्यांना लवकरच रखडलेल्या किस्त
यशवंतराव चव्हाण आवास योजनेतील लाभार्थ्यांना लवकरच रखडलेल्या किस्त
श्री.मा.आ.सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्याकडे संदीप भाऊ पोडे यांची निवेदनात्मक मागणी
महा घडामोडी न्यूज नेटवर्क प्रतिनिधी कमलेश खोब्रागडे चंद्रपूर:यशवंतराव चव्हाण आवास योजनेतील घरकुल लाभार्थ्यांचे गेल्या दोन महिन्यापासून घरकुल चे काम रखडलेले आहे, समोरील काम करण्याकरिता घरकुल लाभार्थ्यांकडे पुरेसा फंड उपलब्ध नसल्यामुळे घर बांधकाम पूर्ण करण्याकरिता अडचणीचा सामना घरकुल लाभार्थ्यांना करावा लागत आहे. विसापूर येथील यशवंतराव चव्हाण या घरकुल लाभार्थ्यांनि भारतीय जनता पार्टी जिल्हा महासचिव संदीप भाऊ पोडे यांच्याकडे जाऊन संपूर्ण समस्या सांगितली संदीप भाऊ पोडे यांनी कुठल्याही क्षणाचा विलंब न करता गरिबांच्या समस्या सोडविणारे चंद्रपूर येथील एकमेव नेते श्री.मा.आ. सुधीर भाऊ मुनगंटीवार यांचकडे निवेदन देऊन ही समस्या सांगितले असता आदरणीय भाऊंनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून तात्काळ पत्र विवाह करण्याचे काम केले लवकरच लाभार्थ्यांना उर्वरित हप्ते देखील मिळणार हे आश्वासन दिले, करिता आदरणीय भाऊंचे घरकुल लाभार्थ्यांतर्फे आभार व्यक्त होताना दिसत आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत