पटवारी संघाचे कामबंद आंदोलन
किशोर कुलकर यांना न्याय देण्याची मागणी
महा घडामोडी न्यूज जिल्हा प्रतिनिधी,शेख हक्कानी, चंद्रपूर/जिवती :- जिवती तालुक्यातील पाटण येथील ग्राममहसूल अधिकारी तथा पटवारी संघाचे अध्यक्ष किशोर कुलकर यांच्यावर चुकीचे आरोप लावून कारणे दाखवा नोटीस बजावली.या अन्यायकारक कारवाई विरोधात राजुरा उपविभाग ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केला आहे. या संदर्भात विदर्भ पटवारी संघाच्या वतीने उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.या निवेदनात ग्राम महसूल अधिकारी किशोर कुलकर यांच्यावरील कारवाई मागे घ्यावे.
हेही वाचा : अस्वलही झाले हनुमानसमोर नतमस्तक, मंदिराची घंटी वाजवली
तसेच राजुरा उपविभागातील अनेक प्रलंबित आर्थिक सेवाविषयक मागण्या पूर्ण कराव्या. या मागण्या करण्यात आल्या आहेत. काम बंद आंदोलनामुळे राजुरा उपविभागीय क्षेत्रातील ग्रामीण भागातील नागरिकांना व शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. किशोर कुलकर हे २७ फेब्रुवारी व ३ मार्चला आपल्या कर्तव्यावर हजर न राहता त्यांनी रेकॉर्ड पूर्ण केले नसल्याच्या आरोपाखाली उपविभागी अधिकारी डॉ. कश्मिरा संख्ये(आयएएस) यांनी कारणे दाखवा नोटीस देऊन त्यांची विभागीय चौकशी सुरू केली. वास्तविक या दोन्ही दिवशी राजुरा तहसील कार्यालयात ऑनलाईन काम करीत असल्याचे कुलकर यांचे म्हणणे आहे.
हेही वाचा : जिवती वनजमीनीच्या पट्ट्यांचा प्रश्न मार्गी लावा; आमदार देवराव भोंगळे कडून लक्षवेधी!
यासोबत तहसीलदार रूपाली मोगरकर यांना तोंडी निर्देश देऊन तलाठी कुलकर यांच्या तलाठी कार्यालयाचे कुलूप तोडून पंचनामा करण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे आहे. ही अन्यायकारक कारवाई राजुरा उपविभागीय अधिकारी डॉ. कश्मिरा संख्ये (आयएएस) यांनी केली. जिवती तहसीलदार रूपाली मोगरकर या रुजू झाल्यापासून तलाठी सवंर्गाला कोणत्याही गोष्टीची शहानिशा न करता त्रास देत आहे. शासकीय कामाच्या बाबतीत कोणताही नवीन विषयासंदर्भात मार्गदर्शन करीत नाही.मात्र, वेळेवर सदर काम न केल्याच ठपका लावला जात आहे.
हेही वाचा : रेशन कार्ड धारकांनी मार्च अखेर पर्यंत ई- केवायसी करून घ्यावी. : पुरवठा निरीक्षण अधिकारी
तलाठी सवंर्गाचे आर्थिक व सेवा विषयक मागण्या यात अतिरिक्त कारभाराचा मेहनताना न मिळणे, नवीन तलाठ्यांना लॅपटॉप न मिळणे, साझ्यावर कोतवाल नसणे, तलाठी कार्यालयात व तहसील कार्यालयात सोयी सुविधा नसणे, भाड्याने केलेल्या तलाठी कार्यालयाचा किराया न मिळणे, सेवा पुस्तके वेळेवर अद्यावत न करणे आदी बाबी प्रलंबित आहेत. असे असताना सुद्धा तलाठी काम करीत आहे. परंतु जाणीवपूर्वक तहसीलदार रूपाली मोगरकर तरास देत असल्याने यापासून न्याय न मिळाल्यास पटवारी संघातर्फे जिल्हयाभरात आंदोलन करण्याचा इशारा पटवारी संघाने दिला आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत