पोलिसांच्या आशीर्वादाने रात्री हायवा ट्रकद्वारे सर्रासपणे रेती आणली जात असल्याची तालुक्यात चर्चा
पोलिसांच्या आशीर्वादाने रात्री हायवा ट्रकद्वारे सर्रासपणे रेती आणली जात असल्याची तालुक्यात चर्चा
महा घडामोडी न्यूज जिल्हा प्रतिनिधी, शेख हक्कानी, जिवती :- चंद्रपूर जिल्ह्यात मागील काही वर्षापासून रेती घाटाचे लिलाव झाले नसल्यामुळे रेतीबंदी असून सुद्धा जिवती तालुक्यात शेकडो ब्रास रेतीचे ढिगारे दिसून येत आहे . प्रश्न असा उद्भवतो की रेतीचे एकही घाट सुरू नसून जिवती तालुक्यात रेती कशी आणली जात आहे. कुठून रेती आणली जात आहे. सामान्य माणसाला प्रश्न भेडसावत आहे. केंद्र शासनाच्या वतीने महाराष्ट्रसह जिवती तालुक्यात प्रधानमंत्री घरकुल योजनेतून घरकुल मंजूर झाले " २" टप्प्याचे रक्कम १५००० हजार रुपये लाभार्थीच्या खात्यात जमा पण झाले. रेतीबंदी असल्यामुळे घरकुल लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी रेती मिळत नसल्यामुळे घरकुल लाभार्थ्यांनी घर बांधकामाची सुरुवात केली नसल्याचे बोलले जात आहे. रेती बंद असल्यामुळे रेतीचे दर गगनाला भिडले आहे.
हेही वाचा : कर्मयोगीच्या वतीने ' जसापूर ' स्वच्छ !
"दिनांक 3 मार्च रोजी अंदाजे रात्री ९:३० ते १० च्या दरम्यान जिवती तालुक्यातील शेणगांव येथून पोलिसांची गाडी जिवती मार्गाला समोर होती व पोलिसांच्या गाडीच्या मागे २ हायवा ट्रक असल्याची चर्चा रंगली होती. त्या हायवा ट्रकमध्ये रेती होती काय चर्चेला उधान आले आहे. पोलिसांची गाडी सहकार्य करण्यासाठी आली होती का? किंवा इतर कामानिमित्त आली होती हा एक प्रश्न चर्चेला आला आहे. सत्येता होती की चर्चा हवेतच केली जात होती हे मात्र तेवढेच खरे. "ये पब्लिक है, सब जानती है ?"



कोणत्याही टिप्पण्या नाहीत