Breaking News

मराठी भाषेचा गौरव व संस्कृतीचा अभिमान "मराठी भाषा गौरव दिन साजरा"

मराठी भाषेचा गौरव व संस्कृतीचा अभिमान "मराठी भाषा गौरव दिन साजरा"

महा घडामोडी न्यूज जिल्हा प्रतिनिधी, शेख हक्कानी, चंद्रपूर : मराठी भाषेचा गौरव व संस्कृतीचा अभिमान व्यक्त करण्यासाठी २७ फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन साजरा  करण्यात आला. यावेळी कार्यक्रमात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांचेकडून मराठी भाषेच्या प्रसार व विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या साहित्यिक, कवी, नाटककार आणि समाजसेवकांना सन्मानित करण्यात आले. मराठी भाषेचा इतिहास, तिची समृद्धता आणि भविष्यातील आव्हानांवर यावेळी मान्यवरांनी चर्चा केली. मराठी ही केवळ भाषा नसून ती आपल्या संस्कृतीचा आधारस्तंभ आहे. तिच्या जोपासनेसाठी प्रत्येकाने प्रयत्नशील राहून कार्य करू असे प्रतिपादन यावेळी जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांनी केले.

हेही वाचा : पोलिसांच्या आशीर्वादाने रात्री हायवा ट्रकद्वारे सर्रासपणे रेती आणली जात असल्याची तालुक्यात चर्चा

यावेळी चंद्रपूर येथील स्त्रीवादी साहित्यातील महत्वाच्या लेखिका व ज्येष्ठ कवियत्री डॉ. पद्मरेखा धनकर, तसेच ‘एक महिना एक कार्यक्रम’ असे घोषवाक्य देत प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी सलग २००९ पासून सृजन संस्थेच्या माध्यमातून मराठी भाषा संवर्धनासाठी विविध कार्यक्रम राबविणारे लेखक आशिष देव सर , सरदार पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ काटकर सर, राज्यातून प्रथम आलेले चिंधीबाजार नाटकाच्या निर्मात्या नाटककार लघुपट निर्मात्या व सामाजिक चळवळीत अग्रेसर असलेल्या प्राचार्य डॉ जयश्री कापसे, कवी व सूर्याश साहित्य मंच संस्थेचे इरफान शेख, नुकत्याच ६३ व्या महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धेत चंद्रपूर केंद्रावरून "द हंग्री क्रो" या नाटकाला निर्मितीत प्रथम पुरस्कार मिळाला या नाटकाचे निर्माते व नाटककार प्रशांत कक्कड या मान्यवरांचा सत्कार यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे करण्यात आला.

मराठी भाषेच्या प्रचार-प्रसारासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याचा संकल्प यावेळी सर्वांनी घेतला. 

सदर सन्मान देतेवेळी मनसे व्यापारी सेनेचे जिल्हाध्यक्ष महेश शास्त्रकार, तालुका अध्यक्ष प्रकाश नागरकर ग्रामपंचायत सदस्य विवेक धोटे,रोजगार स्वयंरोजगार जिल्हाध्यक्ष मनोज तांबेकर,  मनवीसे तालुका उपाध्यक्ष मयुर मदनकर, वर्षा भोमले, राज वर्मा, सचिन बघेल, राकेश सिदुरकर उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत