पुडियाल मोहदा रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष
संबंधित विभागाने दुर्जर झालेल्या रस्त्याकडे लक्ष देवून तात्काळ दुरुस्ती करावी
महा घडामोडी न्यूज जिल्हा प्रतिनिधी,शेख हक्कानी, चंद्रपूर, जिवती :- जिवती तालुक्यातील अतिदुर्गम भागातील रस्त्याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाल्यामुळे तालुक्यातील अनेक रस्त्ये शेवटची घटका मोजत आहे.दमपूर मोहदा ते पुडियाल मोहदा या रस्त्याचे काम भारत निर्माण प्रधानमंत्री ग्राम सडक योजना जिल्हा चंद्रपूर विभागाच्या अंतर्गत काम झाले असून. रस्त्याचे काम झाले की नाही अशी बिकट अवस्था रस्त्याची झाली आहे.या रस्त्याची दोषदायीत्व कालावधी पाच वर्षाची असुन सुद्धा या रस्त्याची देखभाल दुरुस्ती कंत्राटदाराकडे असते.
परंतु या रस्त्याकडे संबंधित प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या विभागाकडून व कंत्राटदाराकडून दुर्लक्ष असल्यामुळे रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी अवस्था रस्त्याची झाली आहे.रस्ता फुटल्यामुळे गिट्टी रस्त्यावर पसरलेली असल्याने परिसरातील लोकांना वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागत असल्याने मनक्याचा त्रास होत आहे.या खराब रस्त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून दमपूर मोहदा ते पुडियाल मोहदा खराब रस्त्याकडे संबंधित विभागाने लक्ष द्यावे रस्त्याची दुरुस्ती तात्काळ करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत