आता घरकुलधारकांना 15 दिवसात वाळू न मिळाल्यास तहसीलदारांवर होणार कार्यवाही
आ.सुधिरभाऊच्या मांगनिला यश
महा घडामोडी न्यूज जिल्हा प्रतिनिधी, शेख हक्कानी, जिवती/ चंद्रपूर : सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे सुरू आहे. महत्त्वाचे म्हणजे अधिवेशनात सत्ताधारी पक्ष्यांच्या नेत्याकडून नच घरचा आहेर दिला जात असल्याचा प्रकार हल्ली विधानसभेत निदर्शनात येऊ लागला आहे. त्यातच सोमवार दिनांक 17 मार्चला राज्यातील नव्या वाळू धोरणाबाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भूमिका स्पष्ट केलि आहे. सर्वप्रथम भाजप नेते तथा आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी वाळू धोरण बाबत विविध प्रश्न उपस्थित केले होते.
मुनगंटीवार यांच्या या प्रश्नाबाबत नव्या वाळू धोरणानुसार अर्ज केल्यापासून 15 दिवसात तहसीलदारांनी घरकुलधारकांना वाळू उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेत आहोत. 15 दिवसात वाळू उपलब्ध न करून दिल्यास तहसीलदारांवर कारवाई केली जाईल. नव्या वाळू धोरणात हे नमूद असेल, तसे तक्रारीसाठी निश्चित एक पोर्टल तयार केली जाईल. अशी ही माहिती महसूल मंत्री बावनकुळे यांनी दिली. येत्या 8 दिवसात नवे वाळू धोरण लागू करण्यात येणार असून घरकुलांना 5 ब्रास मोफत वाळू दिली जाईल,असेही त्यांनी म्हटले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत