नविन एसटी बसेसचे लोकार्पण.
नविन एसटी बसेसचे लोकार्पण.
रा.प.म. आगार, राजुरा
राजुरा एसटी आगाराला नव्याने उपलब्ध झालेल्या पाच एसटी बसेसचे आज राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकारी-कर्मचारी आणि स्थानिक भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमवेत लोकार्पण केले.
मागील महिन्यात राजुरा एसटी आगारात एसटी बसेसी कमतरता असल्याचे आगारातील रापम च्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी माझ्या निदर्शनास आणून दिले होते. त्याची दखल घेत राज्याच्या परीवहन मंत्र्यांना सदर विषय अवगत करून पत्रव्यवहार केला. त्याची फलश्रुती म्हणून राजुरा आगाराला दहा नव्या बसेस मंजूर करण्यात आल्या. त्यापैकी पाच बसेसचे आज लोकार्पण केले असून उर्वरीत पाच येत्या काही दिवसांतच उपलब्ध होणार आहेत.
राजुरा आगाराचे कार्यक्षेत्र मोठे असून याठिकाणी जिवती, कोरपना तालुक्यासारखा दुर्गम भाग असल्याने येथे एसटी बसेसची उपलब्धता असणे अनिवार्य आहे. त्यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील आहे. येत्या काही दिवसांत पंचवीस इलेक्ट्रिकल बसेस सुद्धा राजुरा आगाराला उपलब्ध होतील. यासोबतच नजीकच्या गडचांदूर येथे नविन बसस्थानक निर्मीतीची कार्यवाही ही आता अंतिम टप्प्यात असून गडचांदूरकरांना लवकरच नविन बसस्थानक भेटेल. तसेच कोरपना शहरात सुद्धा नविन बसस्थानक निर्मीतीसाठी शासनस्तरावर माझा पाठपुरावा सुरू असून त्यासंदर्भातही लवकरच सकारात्मक निर्णय होईल. अशी माहीती याठिकाणी बोलताना मनोगतातून व्यक्त केली.
यावेळी माझ्यासमवेत चंद्रपूर विभागीय नियंत्रक श्रीमती स्मिता सुतावणे, आगार व्यवस्थापक राकेश बोधे, भाजपचे तालुका महामंत्री वामन तुराणकर, शहर महामंत्री मिलिंद देशकर, राधेश्याम अडाणीया, सुरेश धोटे, सिनू पांझा, शंकर मडावी, राजेश वाटेकर, छबिलाल नाईक, प्रदिप मोरे, सचिन बल्की, वैभव पावडे, वाहतूक निरीक्षक इमरान शेख, श्रीमती शुभांगी लडके, वेळप्रमूख मनोज कोल्हापुरे, गजानन बोरकुंडवार सहाय्यक कारागीर संजय मडावी, सचिन सहारे आदिंची प्रामुख्याने उपस्थिती होती.
Post Comment
कोणत्याही टिप्पण्या नाहीत