जिवती पोलिसांची सिंघम स्टाईल कारवाई! मौजा मालगुडा येथे हातभट्टी मोहा दारूवर छापा – ११,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
महा घडामोडी न्यूज जिल्हा प्रतिनिधी, शेख हक्कानी, चंद्रपूर : जिवती पोलीस स्टेशनच्या ठाणेदार सपोनि जाधव साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज मौजा मालगुडा येथे सिंघम स्टाईल कारवाई करत हातभट्टी मोहा दारूचा मोठा साठा उध्वस्त करण्यात आला. या कारवाईत एकूण चार इसमांविरुद्ध दारूबंदी कायद्याखाली गुन्हे नोंदवण्यात आले असून ११,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून तो गावाबाहेर नाल्यात नष्ट करण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मा. मुम्मका सुदर्शन, उपविभागीय अधिकारी रवींद्र जाधव (गडचांदूर) आणि पोलीस उपअधीक्षक ईश्वर कातकडे (चंद्रपूर) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कोण होते सहभागी?
या धाडसत्रात ठाणेदार सपोनि जाधव यांच्यासोबत पोस्ट स्टाफचे खालील अधिकारी व कर्मचारी सहभागी होते:
ASI वाघमारे, HC गवाले (2251), पो. शि. जगदीश मुंडे (ब.न. 1388), पो. शि. अतुल कानवटे (ब.न. 2058), पो. शि. किरण वाठोरे (ब.न. 28), पो. शि. सुनील पवार (337), WPC रजनी (530), WPC स्वाती (654)
कारवाईमागचं नेमकं कारण काय?
जिवती पोलीस स्टेशनला मौजा मालगुडा परिसरात काही व्यक्ती बेकायदेशीररित्या हातभट्टी मोहा दारू साठवून विक्री करत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या दारूचा उपयोग गावातील अनेक युवक व नागरिक व्यसनासाठी करत असल्याने गावात सामाजिक वातावरण बिघडण्याची शक्यता होती.
याची गंभीर दखल घेत पोलिसांनी तात्काळ कारवाई करण्याचा निर्णय घेतला. दारू विक्रीमुळे गावात होणारे व्यसनाधीनतेचे प्रमाण, महिलांवरील अत्याचार, गुन्हेगारी प्रवृत्ती यामध्ये वाढ होण्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ठोस पाऊल उचलले.
कायदेशीर कारवाई
सदर प्रकरणात संबंधित चौघांविरुद्ध दारूबंदी कायद्याअंतर्गत कलम ६५ (ई) आणि (फ) अन्वये चार स्वतंत्र गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. पोलीस प्रशासनाकडून ही मोहीम केवळ यापूरती मर्यादित नसून, भविष्यातही अशा प्रकारच्या बेकायदेशीर व गैरकायदेशीर कृत्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
जनतेची प्रतिक्रिया
स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या या धाडसी आणि तत्काळ कारवाईचे स्वागत केले असून, अशा दारू विक्रेत्यांमुळे गावात होणारी बिघडलेली सामाजिक परिस्थिती सुधारेल, अशी आशा व्यक्त केली आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत