श्री. मा. आ. सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या दालनात तब्बल 96 पालकांची मागणी घेऊन संदीप श्रीहरी पोडे यांची हाजरी
श्री. मा. आ. सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या दालनात तब्बल 96 पालकांची मागणी घेऊन संदीप श्रीहरी पोडे यांची हाजरी
गंभीर बाब शाळकरी मुलांना रेल्वे क्रॉसिंग मुळे वाढलाय धोका, छ.शिवाजी महाराज चौक पर्यंत ST-बस पोहचविन्याची अत्यंत गरज
स्वीय सहाय्यक श्री. संतोष अटकरे साहेब ऍकशन मोड मध्ये,
विसापूर मध्ये लवकरच येणार ट्रायल बस
महा घडामोडी न्यूज नेटवर्क प्रतिनिधी कमलेश खोब्रागडे चंद्रपूर: लोकप्रिय आमदार बल्लारपूर विधानसभा क्षेत्र श्री. मा. आ. सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्याकडे विसापूर येथे येणाऱ्या ST बसेस छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंत पोहचण्या करिता मदतीची मागणी तब्बल 96 पालकांचा वतीने भाजपा युवा मोर्चा जिल्हा महासचिव यांनी आदरणीय भाऊंचा कार्यलयात जाऊन केली मागणी
विसापूर वस्ती विभागातील l नागरिकांना व लहान मुलांना टेकडी विभागा कडे येण्या करिता रेल्वे लाईन क्रॉस करून यावं लागत असते, शाळकरी लहान मुलं, प्रोढ नागरिकांना रेल्वे क्रॉसिंग करत असताना जीव धोक्यात घालून रेल्वे क्रॉसिंग करावं लागत असते, करिता विसापूर मध्ये येणारी ST - बस ही छत्रपती शिवाजी महाराज चौक वस्ती विभाग येथे पर्यंत पोहोचवने अत्यंत महत्वाचे झालेले आहे, ही बाब लक्षात येताच बल्लारपूर विधानसभा क्षेत्र चे आमदार आदरणीय सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात स्वीय सहाय्यक श्री मा. संतोष जी अटकरे यांनी संबंधित वरिष्ठ अधिकऱ्याशी चर्चा करून ही बाब समझवून सांगितली व लवकरच विसापूर मध्ये ट्रायल बस पाठवुन बस वस्ती विभाग विसापूर पर्यंत नेण्याचे कार्य करू असे सांगितले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत